Womens Asia Cup : टीम इंडियाचा नऊ गडी राखून विजय

Womens Asia Cup : टीम इंडियाचा नऊ गडी राखून विजय

बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकात आज भारत विरुद्ध थायलंड सामना खेळला गेला. सिल्हेट येथे सुरू असलेल्या या १९ व्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्नेह राणाने तो सार्थकी ठरवत ४ षटकात ९ धावा देत ३ गडी बाद करत धक्के देण्यास सुरुवात केली. या सामन्यात भारत स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वाखाली खेळला. तिने घेतलेला निर्णय उत्तमच ठरला कारण थायलंड संघ १५.१ षटकातच ३७ धावासंख्येवर सर्वबाद झाला. यामुळे भारताला जिंकण्यासाठी केवळ ३८ धावा करण्याची आवश्यकता होती आणि ती धावसंख्या ६ षटकात एक गडी गमावत थायलंडवर ९ गडी राखून मोठा विजय मिळवला.

भारताने महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत थायलंडला १५.१ षटकांत ३७ धावांत गुंडाळले. थायलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. त्यांच्याकडून फक्त एक फलंदाज नानपत कोंचनारिओनकाई (१२) दुहेरी अंकापर्यंत पोहोचली. भारताकडून स्नेह राणाने तीन तर राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मेघना सिंगला एक विकेट मिळाली. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ षटकांत एक गडी गमावून ४० धावा केल्या आणि विजय मिळवला. त्याच्यासाठी सलामीवीर एस. मेघनाने १८ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने नाबाद २० धावा केल्या. त्याचवेळी शेफाली वर्माच्या रूपाने एकमेव विकेट पडली. ती ६ चेंडूत ८ धावा काढून बाद झाली. दुसरीकडे, पूजा वस्त्राकरने १२ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १२ धावा केल्या.

आजच्या सामन्यातील विजयाने गुणतालिकेतील पहिले स्थान अबाधित राखले आहे. भारताबरोबरच पाकिस्तान आणि श्रीलंका संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हे तिन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. बांगलादेशला अजूनही उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे. युनायटेड अरब अमिराती विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालावर हे सर्व अवलंबून आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांना मोठा दिलासा; अखेर खासगी रूग्णालयात उपचारांची परवानगी

Russia-Ukrain War: ७५ क्षेपणास्त्रांसह रशियाने चढवला युक्रेनवर हल्ला, पाच जणांचा जागीच मृत्यू

हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे श्रीरामांनीच ठाकरेंकडून धनुष्यबाण हिसकावून घेतला ; रवी राणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version