Womens Asia: भारताचा बांग्लादेशवर ५९ धावांनी दणदणीत विजय

Womens Asia: भारताचा बांग्लादेशवर ५९ धावांनी दणदणीत विजय

आशिया चषकातील १५व्या सामन्यात आज भारताने यजमान बांगलादेश समोर १६० धावांचे लक्ष ठेवले होते. सिल्हेट क्रिकेट मैदानावर भारत आणि बांगलादेश संघात खेळला गेला. शफाली वर्माच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने यजमान बांगलादेशवर ५९ धावांनी केली मात करत आशिया चषकाची उपांत्य फेरी गाठली. हा सामना जिंकत भारताने गुणतालिकेतील अव्वल स्थान टिकवून ठेवले. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. शफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारतीय महिला क्रिकेट संघानं शनिवारी आशिया चषक २०२२ स्पर्धेतील त्यांच्या पाचव्या सामन्यात गतविजेत्या बांगलादेशचा ५९ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं ५ विकेट्स गमावून बांग्लादेशसमोर १६० धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर बांगलादेशला निर्धारित २० षटकात १०० धावांवर रोखलं. भारताच्या विजयात शेफानी वर्मानं महत्वाची भूमिका बजावली. तिनं फलंदाजीसह गोलंदाजीतंही मोलाचं योगदान दिलं.

सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृतीने दमदार सलामी देत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या दोघींनी १२ षटकात ९६ धावांची सलामी दिली. दरम्यान, अर्धशतकाजवळ पोहचलेली स्मृती मानधना ४७ धावांवर धावबाद झाली आणि ही सलामी जोडी फुटली. यानंतर शेफाली वर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र ती ५५ धावा करून रुमाना अहमदची शिकार झाली. याच रुमानाने १७ व्या षटकात रिचा घोष (४) आणि किरण नवगिरे(०) यांना पाठोपाठ बाद करत भारताची अवस्था ४ बाद १२५ धावा अशी केली. दरम्यान, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दिप्ती शर्मा यांनी भारताला दडशतकी मजल मारून दिली. दिप्ती ५ चेंडूत १० धावा करत बाद झाली. दिप्ती बाद झाल्यानंतर जेमिमाहने भारताला २० षटकात १५९ धावांपर्यंत मजल मारून दिले. तिने २४ चेंडूत नाबाद ३५ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून रुमाना अहमदने ३ षटकात २७ धावा देत ३ बळी टिपले.

हे ही वाचा:

मोदींनी देश जोडण्याचे काम केले तर, काँग्रेसने आसामला दहशतवादी बनवले, अमित शहांचा हल्लाबोल

जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा तर, पुत्र जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version