spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज ठरणार महिला प्रिमीयर लीगचा पहिला विजेता, मुंबई विरुद्ध दिल्ली

महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचा या वर्षीचा पहिलाच हंगाम आहे. महिला प्रीमियर लीगचा आज स्पर्धेचा विजेता मिळणार आहे. २६ मार्च रोजी अखेरचा म्हणजेच फायनलचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) असा खेळवला जाणार आहे.

महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचा या वर्षीचा पहिलाच हंगाम आहे. महिला प्रीमियर लीगचा आज स्पर्धेचा विजेता मिळणार आहे. २६ मार्च रोजी अखेरचा म्हणजेच फायनलचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) असा खेळवला जाणार आहे. हा अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या आयपीएल २०२३ च्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाचा विचार केल्यास दोघांनी अखेपर्यंत टेबल टॉपर राहण्याची कमाल केली. या दोन्ही संघानी प्रत्येकी ८-८ सामने खेळून दोघांनी देखील ६-६ सामने जिंकले आहेत आणि २-२ सामने गमावले आहेत. सर्वात आधी दिलीलीचा संघ फायनलमध्ये पोहोचला त्यांनतर मुंबई इंडियन्स चा संघ एलिमिनेटरच्या सामन्यात युपी वॉरियर्सला मात देत फायनल गाठली आहे.

दोन्ही संघानी या वर्षीच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि आज एक रंगतदार सामना पाहायला मिळू शकतो. महिला प्रीमियर लीगचा हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे आणि भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता सुरु होणार आहे. सामान्यांच्या अर्धा तास म्हणजेच ७ वाजता टॉस होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अँप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.

मुंबई इंडियन्सचा महिला संघ :
हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक, हेदर ग्रॅहम, क्लो ट्रायॉन, धारा गुज्जर, सोनम यादव, नीलम बिश्त, प्रियांका बाला

दिल्ली कॅपिटल्स महिला संघ :
मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणी, अपर्णा मंडल, तीतस साधू, स्नेहा दीप्ती, लॉरा हॅरिस, पूनम यादव

हे ही वाचा : 

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवत कायम करून वेतन फरक द्या, बाळासाहेब थोरात

शरद पवारांबद्दल मंत्री दादा भुसे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss