World Cup 2023, टीम इंडियाच्या ‘या’ १५ खेळाडूंची झाली निवड…

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar ) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय शिलेदारांची नावे जाहीर केली.

World Cup 2023, टीम इंडियाच्या ‘या’ १५ खेळाडूंची झाली निवड…

विश्वचषकासाठीच्या (World Cup 2023) १५ खेळाडूंची घोषणा आज करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar ) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय शिलेदारांची नावे जाहीर केली. आपेक्षाप्रमाणे १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांना अंतिम १५ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे भारतीय संघ फक्त एकच प्रमुख फिरकी गोलंदाजासह विश्वचषकात उतरणार आहे. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असेल. तर इशान किशन (Ishan Kishan) आणि केएल राहुल (KL Rahul) विकिकेटकिपर म्हणून भूमिका बजावतील.

०५ ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी अखेरचा म्हणजेच फायनल सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला ०८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई (Chennai) येथे रंगणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाचे कॉम्बिनेशन चांगले दिसत आहे. संघामध्ये पाच फलंदाज आहेत. दोन विकेटकिपर आहेत. ४ अष्टपैलू खेळाडू आणि ४ गोलंदाजासह भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे.

विश्वचषकाच्या अंतिम १५ खेळाडूमध्ये संजू सॅमसन (Sanju Samson) आणि तिलक वर्मा (Tilak Verma) यांना संधी मिळाली नाही. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा यालाही स्थान मिळवण्यात यश आले नाही. भारताच्या १५ जणांच्या चमूमध्ये एकही ऑफ स्पिनर गोलंदाजाला स्थान दिले नाही. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांनाही अंतिम १५ खेळाडूमध्ये संधी देण्यात आली नाही. विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याची विश्वचषकासाठी निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केएल राहुल याच्या फिटनेसबाबतही अपडेट दिली. केएल राहुल याने एनसीएमध्ये (NCM) फिटनेसवर काम केलेय. त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असे अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विश्वचषकासाठी भारताचे १५ शिलेदार (India’s 15 players for the World Cup) –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

विश्वचषकातील भारताचे वेळापत्रक (India’s World Cup Schedule) –

हे ही वाचा: 

 शरद पवारांची पक्षफुटीनंतर जळगावमध्ये पहिलीच सभा, आज कोणाला करणार टार्गेट ?

Asia Cup 2023 IND vs Pak, भारत आणि पाकिस्तानच्या ‘सुपर-४’ सामन्यात पुन्हा पाऊस आला तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version