WTC – भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दिली ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांना श्रद्धांजली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन संघांमध्ये आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल World Test Championship Final) सुरु झाली आहे.

WTC – भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दिली ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांना श्रद्धांजली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन संघांमध्ये आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल World Test Championship Final) सुरु झाली आहे. आजचा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर सुरु आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप कोण पटकावणार ? याकडे जगामधील सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ओव्हल मैदानावर ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचबरोबर एक मिनिटाचे मौन पाळत दोन्ही संघातील खेळाडूंनी श्रद्धांजली अर्पण केली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या आधी दोन्ही संघातील खेळाडू मैदानात दंडावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत. बीसीसीआयने याबाबतीत त्याच्या ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये आयसीसी लिहिले आहे की, ‘ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झालाय. त्याशिवाय एक हजार पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. भारतात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात होय. या दुर्देवी रेल्वे अपघातानंतर अनेक दिग्गजांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. आज भारत आणि ऑस्ठ्रेलियाच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधून रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली’ असे बीसीसीआयने याबाबत ट्वीट केले आहे.

भारतीय संघाची प्लेइंग ११ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के एस भरत (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११ –
डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नश लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, अलेक्स कैरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलेंड

हे ही वाचा:

नवी मुंबईत घ्या Tirupati Balajiचं दर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मंदिराचं भूमिपूजन

बारावीनंतर नाही तर दहावीनंतर करता येतील हे Diploma; जाणून घ्या सविस्तर

डाळ भात खाऊन आलाय कंटाळा ? मग बनवा घरच्या घरी हॉटेल स्टाईल Dal Khichadi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version