“तुम्ही ड्रायव्हर घेऊ शकता”, कार अपघातानंतर कपिल देव यांचा ऋषभ पंतला संदेश

“तुम्ही ड्रायव्हर घेऊ शकता”, कार अपघातानंतर कपिल देव यांचा ऋषभ पंतला संदेश

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Wicketkeeper batsman Rishabh Pant) ३० डिसेंबर रोजी झालेल्या भीषण कार अपघातातून बचावला. आलिशान कार (luxury car) चालवत असताना, पंत दिल्लीहून रुरकीला जात असताना झोपी गेला (fell asleep). त्यामुळे त्यांची कार दुभाजकावर आदळली (Hit the divider) आणि आग लागली. सुदैवाने, पंत विंडस्क्रीन (Windscreen) तोडण्यात यशस्वी झाले आणि आगीने संपूर्ण कार व्यापण्यापूर्वी दोन ट्रक चालकांनी (Two truck drivers) त्यांना बाहेर काढले. पंतच्या अपघाताच्या भयानक दृश्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, भारतीय क्रिकेटचे दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांनी त्याला आणि इतर क्रिकेटपटूंना कधीही एकटे गाडी चालवू नका असा सल्ला दिला आहे.

ऋषभ पंतच्या अपघातावर कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारतीय संघातील युवा क्रिकेटपटूंना सल्ला दिला आहे. कपिल देव म्हणाले की भारतीय संघातील टॉपचे क्रिकेटपटू आपल्या गाडीवर सहज चालक (Driver) ठेवू शकतात. त्यानी कायम आपल्यासोबत एक चालक घेऊनच प्रवास केला पाहिजे. कपिल देव यांनी याबाबत आपले उदाहरण देखील दिले. ते म्हणाले की, ‘ज्यावेळी मी एक युवा क्रिकेटपटू होतो त्यावेळी माझा मोटरसायकलवरून (motorcycle) जाताना अपघात झाला होता. त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या भावाने मला मोटरबाईकला हात देखील लावू दिला नाही. ऋषभ पंत बरा आहे हे ऐकून बरे वाटले.’

कपिल देव पुढे म्हणाले की, ‘तुमच्याकडे चांगल्या दिसणाऱ्या चांगला वेग असलेल्या पॉश गाड्या आहेत. मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही सहजरित्या गाडीवर चालक ठेवू शकतो तुम्हाला ते आरामात परवडतेही. तुम्ही एकट्याने प्रवास करणे टाळले पाहिजे.’ ‘कुणाला चांगल्या चांगल्या गाड्यांची आवड असते हे मी समजू शकतो. या वयात अशी आवड असणे नैसर्गिक आहे. मात्र तुमच्यावर काही जबाबदारी देखील आहे. तुम्हीच स्वतःची उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकता. तुम्ही तुमच्यासाठी काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत.’

हे ही वाचा:

या व्हिडिओने केली कपिल शर्माची पोलखोल, टेलिप्रॉम्पटर वापरून करतो कॉमेडी

विरोधकांनी केलेल्या नोटबंदीच्या घेऱ्यातून मोदींची सुटका | SC Demonetisation Judgement | PM Modi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version