spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

क्रिकेटर्सच्या ग्लोव्हज आणि हेल्मेटची किंमत ऐकून व्हाल थक्क, जाणून घेऊयात किंमत आणि ….

क्रिकेटर्सच्या ग्लोव्हज आणि हेल्मेटची किंमत ऐकून व्हाल थक्क, जाणून घेऊयात किंमत आणि ....

यंदाचा क्रिकेट विश्वचषक भारतात होणार आहे त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता ही शिगेला पोहचली आहे. याच क्रिकेटची क्रेज भारतात नेहमीच खूप जास्त असते त्यामुळे क्रिकेट हा भारतात धर्म म्हणून मानला जातो असंही म्हटलं जातं. याच क्रिकेट बाबतची एक मनोरंजक आणि थक्क करणारी माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खेळण्यासाठी मैदानात उतरताना क्रिकेटपटू हेल्मेट आणि ग्लोव्हज घालून उतरतात.पण त्यांची किंमत तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल. तर आज जाणून घेऊयात, ही किंमत ऐकून व्हाल थक्क.

भारतात क्रिकेटची क्रेज खूप आहे त्यामुळे असा तुम्हाला एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याने कधी क्रिकेट हा खेळ ऐकला किंवा पाहिला नसेल. तुम्ही तुमच्या शहरात, गल्लीत किंवा गावातील कोणत्याही मैदानावर गेलात तर तुम्हाला तिथे नक्कीच काही मुलं क्रिकेट खेळताना दिसतील. अगदी अरुंद रस्ता किंवा गल्लीमध्येही मुलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पण, व्यावसायिक खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये लेदर सिसन बॉल, बॅट आणि सुरक्षित उपकरणे वापरली जातात.

गल्ली क्रिकेटमध्ये टेनिस बॉल किंवा कॅनव्हासचा सिसन बॉल असल्यामुळे दुखापतीचा धोका हा फारसा नसतो. पण भारताकडून खेळणारे क्रिकेटपटू सिसन लेदर बॉलने खेळतात आणि त्यामुळे गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याचाही धोका देखील अधिक असतो. क्रिकेट खेळताना असे अनेक अपघात यापूर्वी घडले आहेत ज्यामध्ये बॉल डोक्याला लागल्याने खेळाडूला गंभीर दुखापत होऊन मृत्यू देखील झाला आहे. हेच अपघात टाळण्यासाठी ICC ने काही नियम बनवले. व्यावसायिक क्रिकेटपटूंनी घातलेल्या हेल्मेटची किंमत २००० ते २०,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असू शकते, ही हेल्मेटची किंमत त्याच्या ब्रँड आणि गुणवत्तेवर अवलंबून असते. यासोबत क्रिकेटर्स जे ग्लोव्हज घालतात त्याची किंमत देखील २०,००० रुपयांपेक्षा जास्त असते. अधिक चांगल्या लेदर आणि मटेरियलचे बनवलेले ग्लोव्हज असतील तर त्याची किंमत आणखी जास्त असते.

हे ही वाचा : 

रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण

कंत्राटी भरती विरोधात लातूरमधील हजारो विद्यार्थी आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss