सुरक्षा दलाच्या चकमकीत एक दहशतवादी ठार!

जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.

सुरक्षा दलाच्या चकमकीत एक दहशतवादी ठार!

Baramulla attack

बारामुल्ला, जम्मू-काश्मीर : आज जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बारामुल्ला येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये एक दहशतवादी मारला गेला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, बारामुल्ला परिसरामध्ये लष्कर आणि पोलीस यांची शोधमोहीम सुरु आहे. या शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांकडून शस्त्रे जप्त करत सुरक्षा दलाने मोठी कामगिरी पार पडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना दोन दहशतवादी बारामुल्ला येथे लपून असल्याची माहिती मिळाली होती. पुढे झालेल्या सर्च ऑपेरेशनमध्ये सर्व जागा बंद करून पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे आदेश देण्यात आले. सर्च ऑपेरेशन सुरु झाल्यानंतर गोळीबाराला सुरुवात झाली. बराच वेळ सुरु असलेल्या गोळीबारानंतर एका दहशतवाद्याला ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले. झालेल्या चकमकीमध्ये दोन जवान देखील जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.

लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवादी अटकेत!

जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन सदस्यांना शनिवारी अटक केली. या दोन दहशतवाद्यांकडे दोन पिस्तूल, त्या पिस्तुलांच्या मॅगझिन्स आणि ११ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, डांगीवाचा पोलिस स्टेशनच्या हडीपोरा-रफियााबादमध्ये सुरक्षा दलाद्वारे नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांना पाहून लोरीहामा लिंक रोडवरून हडीपोराच्या दिशेने येत असलेल्या दोन इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. सोपोर पोलीस, राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफच्या जवानांनी या दोन्ही संशयितांचा पाठलाग केला. दोघांची झडती घेत असताना त्याच्याजवळ २ पिस्तूल, त्यांच्या मॅगझिन्स आणि ११ जिवंत काडतुसे सापडली. दोन्ही दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात सेनेला यश आले आहे.

आकडेवारीप्रमाणे, २०२१ या वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादीविरोधी चकमकींमध्ये १४६ दहशतवादी ठार झाले असून तीन सुरक्षा रक्षक शाहिद झाले आहेत. तसेच ४१ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षी दहशतवादी कारवायांमध्ये एकूण ६३ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.

Exit mobile version