spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“एका दशकात भारताने केली फिनटेक क्रांती”; PM Narendra Modi यांचा दावा

वाढवणं बांदरानिमित्त आज (२० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण झाले आहे. या मार्गक्रमणाचा पहिला टप्पा हा  सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला ते भेट आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दुपारी दीडच्या सुमारास ते पालघरसाठी रवाना झाले आहेत, पालघर येथील सिडको ग्राऊंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असणार आहे. या बंदराच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान त्यांनी जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर यथे संबोधन केले आहे. जणूयात ते काय म्हणाले आहेत.

“गेल्या १० वर्षांमध्ये आमच्या सरकारच्या काळात भारतातील बँकिग व्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स असणारी जनधन खाती या त्रिवेणी संगमाने भारतात कमाल केली आहे. पूर्वी लोकं भारतात यायचे तेव्हा येथील सांस्कृतिक विविधता (कल्चरल डायव्हर्सिटी) पाहून थक्क व्हायचे. मात्र, आज जगातील लोकं जेव्हा भारतात येतात तेव्हा येथील फिनटेक डायव्हर्सिटी पाहून भारावून जातात,” असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईतील जिओ सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ च्या व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जगभरातून आलेल्या उद्योजकांच्या समोर आपल्या सरकारच्या निर्णयांचा पाढा वाचताना पूर्वीच्या काँग्रेसशासित राजवटीवर टीका केली. त्यांनी म्हटले की, गेल्या १० वर्षांमध्ये भारतातील फिनटेक क्षेत्रात ३१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. या काळात देशातील फिनटेक स्टार्टअपमध्ये ५०० टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय, स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन खात्यांनी भारतात कमाल केली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

“पूर्वी स्वत:ला विद्वान समजणारे लोक संसदेत उभं राहून भारतातील फिनटेक क्रांतीविषयी प्रश्न उपस्थित करायचे. जेव्हा सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा हेच लोक रस्त्यात पहिले उभे होते. पण हे लोक म्हणायचे की, भारतातील गावांमध्ये बँकेच्या शाखा नाहीत, इंटरनेट नाही, वीज नाही, मग रिचार्जिंग कुठून करणार? अशा परिस्थितीत भारतात फिनटेक क्रांती कशी होणार, असा सवाल हे विद्वान लोक माझ्यासारख्या चहावाल्याला विचारायचे. पण आज बघा, फक्त एका दशकात भारतातील ब्रॉडबँड युजर्सची संख्या ६ कोटीवरुन ९४ कोटीपर्यंत पोहोचली आहे. आज देशात क्वचितच अशी व्यक्ती असेल की, जी १८ वर्षांची आहे त्याच्याकडे त्याची डिजिटल ओळख असणारे आधार कार्ड नाही. आजघडीला देशातील ५३ कोटी लोकांकडे जनधन खाती आहेत. याचा अर्थ गेल्या १० वर्षांमध्ये आम्ही युरोपियन महासंघातील देशांच्या एकत्रित संख्येइतक्या लोकांना बँकिग व्यवस्थेशी जोडले,” असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.

हे ही वाचा:

“आदिवासी भागातील PESA कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक”; Cm Eknath Shinde यांची ग्वाही

Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss