spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केंद्र सरकारचा पीएफ धारकांसाठी मोठा निर्णय; पीएफमधून पैसे काढण्याच्या मर्यादेत झाली इतकी वाढ…

जर तुम्हालाही पीएफ मधून पैसे काढायचे असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वैयक्तिक कारणाकरिता पीएफमधून पैसे काढण्याची मर्यादा आता सरकारने वाढावली आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय कामगार मंत्री (Union Minister of Labour) मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी दिली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य यापुढं एकावेळी एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकणार आहेत. यापूर्वी कर्मचाऱ्यांना केवळ ५० हजार रुपये काढता येत होते. पण आता ही रक्कम थेट दुप्पट करण्यात आली असून एक लाख इतकी करण्यात आली आहे.

ईपीएफओच्या संचालनामध्ये कामगार मंत्रालयाने विविध बदल केले आहेत. त्यामुळे कर्मचारी सरकारवर खुश झाले आहेत. कर्मचाऱ्यांची असुविधा आणि आर्थिक गरज लक्षात घेऊन सरकारने हे नवे बदल घडवून आणण्याचे जाहीर केले. तसेच नव्या ईपीएफओ धारकांनाही खुशखबर आहे. ज्यांनी आपल्या नव्या नोकरीत सहा महिने पूर्ण केले असतील त्यांनाही ईपीएफओ खात्यातून पैसे काढता येणार आहेत. त्यामुळे लाखो नव्या कर्मचाऱ्यांना सरकारच्या या महत्वाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

वाढती महागाई पाहताच सरकारच्या या निर्णयाचं सर्व ईपीएफओ धारकांकडून कौतुक केले जात आहे. कारण कर्मचारी आपल्या आरोग्याशी संबंधित आणि लग्न यासारख्या कारणांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे काढतात. वाढत्या किमतींमुळे पैसे काढण्याची मर्यादा वाढवली गेली आहे. साधारणपणे पन्नास हजार ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजेसाठी कमी पडत होती असे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं. केंद्र सरकारने ईपीएफओमध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. तो म्हणजे देशात १७ कंपन्या अश्या आहेत ज्यात कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे एक लाख इतकी आहे. या कंपन्या स्वत:च्या निधीऐवजी ईपीएफओकडं वळणार असतील तर त्यांना परवानगी दिली जाणार आहे. सरकारकडून पीएफ बचतीवर चांगल्या प्रकारे रिटर्न मिळते त्यामुळे या कंपन्यांसाठी चांगली संधी आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss