spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठी माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही…पैशांचा माज असलेल्या आशिष पांडेचं रेल्वेतून निलंबन

व्हायरल झालेल्या त्या ऑडियो क्लिपमुळे आशिष पांडेला पश्चिम रेल्वेने निलंबित केले आहे. अखेर काय होतं त्या ऑडियो क्लिपमध्ये ? आशिष पांडे नेमकं काय बोलला?

सोशल मीडियावर नेहमी अनेक व्हिडियो वायरल होत असतात. त्यातलाच पश्चिम रेल्वेमध्ये काम करणारा टीसी आशिष पांडे याची एक ऑडियो क्लिप काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या त्या ऑडियो क्लिपमुळे आशिष पांडेला पश्चिम रेल्वेने निलंबित केले आहे. अखेर काय होतं त्या ऑडियो क्लिपमध्ये ? आशिष पांडे नेमकं काय बोलला?

काही दिवसांपूर्वी टीसी असलेल्या आशिष पांडे याच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये आशिष पांडे समोरच्या मराठी व्यक्तीला सुनावताना दिसत आहे. यामध्ये आशिष पांडे म्हणतो की, “मी विक्रोळीला टागोर नगरला राहतो. मी मुस्लिम आणि मराठी लोकांना बिझनेसच देत नाही. मला कोणी मराठी किंवा मुस्लिम रिक्षावाला भेटला तर मी त्यांच्या रिक्षातही बसत नाही. मी फक्त यूपीवाला रिक्षावाला असेल तरच रिक्षात बसतो”. अशी माजोरड्यासारखी भाषा आशिष पांडे याने वापरली होती. ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर पश्चिम रेल्वेने आशिष पांडेला निलंबित केलं आहे.

मराठी व्यक्तीने व्यवसायासंदर्भात आशिष पांडेला फोन केला होता त्यालाही पांडेनी मी तुला बिझनेस देणार नाही, असं सांगितले. त्याने म्हटले की, “मी ट्रू कॉलरमध्ये तुमचा नंबर पहिला. तुम्ही मराठी आहात हे बघितल्यानंतर मी तुमचा नंबर डिलीट केला, हे तुम्हाला माहिती असेलच. कारण मला मुस्लिम आणि महाराष्ट्रीयन माणसाला बिझनेस द्यायचा नाही. मी ९ वाजता कामाला जातो आणि १० वाजेपर्यंत ५००० रुपये कमावलेले असतात. मला पैशांचा गर्व नाही, पण मी तुम्हाला हे सांगतोय. मी मुंबईत असेपर्यंत मराठी आणि मुस्लिम लोकांना एका रुपयाचा बिझनेस देणार नाही असे सांगून आशिष पांडे याने फोन ठेवून दिला होता. त्याची ही क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. त्यानंतर आशिष पांडे हा कोण आहे, याचा शोध घेतला गेला. यानंतर रेल्वेकडून आशिष पांडे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आता  त्याची चौकशी केली जाईल. व्हायरल झालेल्या या ऑडिओवर विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. यानंतर DRM मुंबई सेंट्रल यांनी आशिष पांडेचं निलंबन केलं आहे. या झालेल्या गोष्टीची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असल्याचं पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

वरळीत तीन आमदार मात्र झिरो विकास! Shrikant Shinde यांची उबाठावर घणाघाती टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss