Wednesday, September 25, 2024

Latest Posts

सोशल मीडिया अकाउंट्स आणि युट्यूब चॅनेल बॅन करत सरकार मिळवणार फेक न्यूजवर ताबा

भारत सरकारने 94 युट्यूब चॅनेल, 19 सोशल मीडिया अकाउंट्स 747 युआरएल ब्लॉक केल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

फेक न्यूज म्हणजेच बनावट बातम्यांना आळा घालण्यासाठी घालण्यासाठी भारत सरकारने 94 युट्यूब चॅनेल, 19 सोशल मीडिया अकाउंट्स 747 युआरएल ब्लॉक केल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

“ही कारवाई माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69ए च्या अंतर्गत करण्यात आली आहे,” असे एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. मंत्रालयाने देशाच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्या यूट्यूब चॅनेलच्या विरोधात ही कारवाई केली आहे.यापुढे अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारने बनावट बातम्यांच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून देशाचा वाईट प्रचार करून देशाच्या सार्वभौमत्वाविरूद्ध काम करणाऱ्या एजन्सींविरूद्ध जोरदार कामगिरी केली आहे.

या वर्षाच्या सुरूवातीस,माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाकिस्तानात युट्यूब चॅनेलवर कार्यरत असणाऱ्या आणि भारताबद्दल चुकीची आणि खोटी माहिती पसरवणाऱ्या 35 न्यूज चॅनेल आणि दोन वेबसाइट्सवर कारवाई केली. मंत्रालयाने ब्लॉक केलेल्या युट्यूब चॅनल्सना 12 दशलक्षाहून अधिक सबस्क्राईबर होते. तसेच त्यांच्या व्हिडिओजना 1.3 अब्ज इतके व्ह्यूज होते.

मोहम्मद झुबैरला उद्देशून अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘फॅक्ट-चेकर’ आणि फॅक्ट – चेकर आहोत असे भासवून देशात तणाव निर्माण करणाऱ्यांमधील फरक आपण जाणून घेतला पाहिजे.

 

Latest Posts

Don't Miss