105 वर्षीय आजीने बनवला नवीन रेकॉर्ड

आजीचे नाव रामबाई असं आहे. गेल्या आठवड्यात बंगळुर येथे राष्ट्रीय ओपन मास्टर्स एथलेटिक्स चैम्पियनशिप मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.

वयाची 60 वर्षे उलटली की लगेचच शरीरात थकवा जाणवायला सुरुवात होते. हरियाणातील 105 वर्षाच्या आजीने जे केलं ते पाहुन तुम्हीं थक्क व्हाल. हरियाणातील आजीने 100 मीटर च्या फर्राटा रेस 45.40 सेकंदात पूर्ण करून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. या आजीचे नाव रामबाई असं आहे. गेल्या आठवड्यात बंगळुर येथे राष्ट्रीय ओपन मास्टर्स एथलेटिक्स चैम्पियनशिप मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. आधी हा रेकॉर्ड मान कौर यांच्या नावावर होता. त्यांनी ही रेसिंग 74 सेकंदात पूर्ण केली होती.
105 वर्षीय आजी रामबाई ह्या चरखी दादरी जिल्ह्यातील कादमा या गावात राहतात राष्ट्रीय स्तरावरील  एथलेटिक्स चैम्पियनशिप मध्ये तिच्या  तीनही पिढ्यांसोबत  100, 200 मीटर धाव, रिले धाव उंच उडी यामध्ये त्यांनी 4 गोल्ड मेडल मिळवून इतिहास रचला आहे. रामबाई या गावातील सगळ्यात जास्त वयस्कर आहे. गावात आजीला उडणपरी या नावाने जास्त बोलावले जाते. आजी 105 वर्षीय असल्या तरीही त्या स्वतः चं काम स्वतः करतात आणि अजूनही त्या तितक्याच जास्त फिट आहेत. आजीला पाहून अनेकांचा आत्मविश्वास वाढतो.
स्वतःला तितकंच फिट ठेवण्यासाठी त्या सकाळी लवकर उठून 5 ते 6 किलोमीटर धाव घेण्यासाठी जातात. नोव्हेंबर 2021 मध्ये वाराणसीत मास्टर्स एथलेटिक्स मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांना त्यांच्या वयापेक्षा कला  महत्वाची होती. सहभागी झाल्यानंतर रामबाई या सकाळी 4 वाजता उठून रेसिंग ची तयारी करायच्या. एवढंच नव्हे तर रामबाई यांची 62 वर्षीय मुलगी संतरा देवी सुदधा रिले रेस मध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. गावातल्या रहिवाशांना  रामबाई यांचा खूप अभिमान वाटतो.
Exit mobile version