Twitter Account तब्ब्ल १५० कोटी ट्विटर अकाउंट करणार डिलीट, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय

गेल्या काही महिन्यांपासून ट्विटर आणि या कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. टेस्लाचे सीईओ, प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश एलॉन मस्क हे ट्विटरचे सर्वेसर्वा झाल्यापासून त्यांनी धक्कादायक निर्णयांचा सपाटा लावला आहे.

Twitter Account  तब्ब्ल १५० कोटी ट्विटर अकाउंट करणार डिलीट, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय

Twitter Account : गेल्या काही महिन्यांपासून ट्विटर आणि या कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. टेस्लाचे सीईओ, प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश एलॉन मस्क हे ट्विटरचे सर्वेसर्वा झाल्यापासून त्यांनी धक्कादायक निर्णयांचा सपाटा लावला आहे. एकीकडे कंपनीत कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीचा प्रश्न ऐरणीवर आहे. तर दुसरीकडे मस्क एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. मस्क यांनी नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन जगभरातल्या युझर्सना मोठा धक्का दिला आहे. मस्क यांनी १५० कोटी अकाउंट्स डिलीट करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. ट्विटर लवकरच १५० कोटी निष्क्रिय अकाउंट्स बंद करणार आहे, असं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटरवर स्पष्ट सांगितलं की, ज्या १५० कोटी अकाउंटला बंद करण्यात येणार आहे, त्यामध्ये दिर्घकाळापासून सक्रीय नसलेल्या अकाउंटचा समावेश करण्यात येईल. म्हणजेच, मागील काही वर्षांपासून ज्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट शेअर करण्यात आली नाही, तसंच कोणत्याही प्रकारचं सक्रीय सहभाग दिसला नाही, अशांना इनअँक्टिव्ह करुन बंद करण्यात येईल.

याबाबत माहिती देताना त्यांनी म्हटलं, १५० कोटी ट्विटर अकाउंटला लवकरच बंद करण्यात येईल, जे अकाउंट अनेक वर्षांपासून सक्रीय नाहीत. अशा अकाउंटला प्लॅटफॉर्मवरून काढून टाकून नवीन युजरसाठी जागा बनवण्यात येईल. या १५० कोटी अकाउंटला काढून टाकण्याचं काम वेगानं सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे ट्विटर युजरची चिंता वाढली आहे. या लिस्ट मध्ये आपला अकाउंट आहे का? असा प्रश्न युजर्सला पडला आहे.

कोणती खाती हटवली जातील –

१५ वर्षांपासून निष्क्रिय असलेली अकाउंट्स हटवली जातील, असं एलॉन मस्क यांनी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. तथापि, जी अकाउंट्स एक वर्षापेक्षा जास्त काळ निष्क्रिय आहेत, त्यांनादेखील धोका असू शकतो, असे संकेत मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये दिले होते. मस्क यांनी पदभार स्वीकारताच ट्विटरच्या दैनंदिन सक्रिय युझर्सची संख्या वाढली आहे, असं काही अहवालांमधून स्पष्ट झालं आहे.

निष्क्रिय युझर्सकडे जे ट्विटर हँडल आणि युझरनेम आहे, ते इतर युझर्सना हवं आहे, अशी तक्रार काही युझर्सनी केली आहे. ट्विटरच्या सुरुवातीच्या काळात अशी खास हँडल्स आणि युझरनेम्स ताब्यात घेण्यात आली होती. ट्विटरने १३.७ कोटी युझर्सचा समावेश मोनेटायझेबल डेली अ‍ॅक्टिव्ह युझर्सच्या वर्गवारीत केला आहे. हे युझर्स ट्विटर प्लॅटफॉर्मवर नियमित अ‍ॅक्टिव्ह असतात आणि त्यांना जाहिरातीदेखील दिसतात. त्यामुळे आता अकाउंट डिलीट करण्यासाठी ट्विटर नेमके कोणते निकष लावतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ट्विटरवर ट्विट व्ह्यूज दिसतील –

तसेच, ट्विटरचे नवे मालक Elon Musk यांनी असेही सांगितले आहे की, आता ट्विटवरही व्ह्यूज दिसतील. याद्वारे युजर्सना समजेल की, किती युजर्सनी त्यांचे ट्विट पाहिले आहे. व्हिडिओवरील प्रमाणेच ते असेल.

Exit mobile version