spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१८ वर्षांपूर्वी याच दिवशी Tsunami ने केला होता कहर, लाखो लोक पावले होते मरण , जाणून घ्या २६ डिसेंबरचा इतिहास

भूकंपानंतर त्सुनामीने भारतासह श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीव, मलेशिया आणि थायलंडच्या आसपासच्या भागात प्रचंड विध्वंस केला.

२६ डिसेंबरचा दिवस इतिहासात एक दुःखद घटना म्हणून नोंदवला जातो. खरं तर, या दिवशी २००४ मध्ये, इंडोनेशियाच्या ( Indonesia) उत्तरेकडील भागात असलेल्या आचेजवळ रिश्टर स्केलवर ८.९ तीव्रतेच्या भूकंपानंतर, समुद्राखालील त्सुनामीने (Tsunami) भारतासह (India) अनेक देशांमध्ये प्रचंड विध्वंस घडवून आणला होता. तोपर्यंत त्सुनामीचा (Tsunami) पूर्व इशारा देणारी कोणतीही यंत्रणा प्रचलित नव्हती. याचा परिणाम असा झाला की अशा विध्वंसाची कोणाला कल्पनाही नव्हती. या सागरी कहरामुळे थायलंड (Thailand) आणि इतर देशांतील समुद्रकिनारी बांधलेल्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये मुक्काम करणाऱ्या परदेशी पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात बळी गेला.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात २६ डिसेंबर या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१९०४: या दिवशी देशातील पहिली ‘क्रॉस कंट्री मोटरकार रॅली’ दिल्ली ते मुंबई दरम्यान सुरू झाली.

१९२५: भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना २६ डिसेंबर रोजीच झाली.

१९७८: माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची या दिवशी तुरुंगातून सुटका झाली, घडलेले असे की, मोरारजी देसाई यांच्या सरकारने १९ डिसेंबर रोजी इंदिरा गांधींना अटक केली होती.

१९९७: ओडिशाचे प्रसिद्ध नेते बिजू पटनायक यांचे पुत्र नवीन पटनायक यांनी बिजू जनता दल (BJD) ची स्थापना केली.

२००३: इराणच्या दक्षिण पूर्व बाम शहरात जोरदार भूकंप झाला. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली.

२००४: भूकंपानंतर त्सुनामीने भारतासह श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीव, मलेशिया आणि थायलंडच्या आसपासच्या भागात प्रचंड विध्वंस केला. ज्यामध्ये सुमारे २ लाख ३० हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

२००६: या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ७०० बळी घेत इतिहास रचला.

हे ही वाचा:

Adani Willmarसह या कंपन्यांच्या आयपीओने गुंतवणुकदारांना दिला बंपर परतावा तर ‘या’ कंपन्यांनी केले मोठे नुकसान

४७ चिनी विमानांनी हवाई संरक्षण क्षेत्रात प्रवेश केल्याचा तैवानचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss