spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Amazon मध्ये काम करणाऱ्या १८,००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा!

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून अमेझॉन (Amazon) कंपनीला ओळखले जाते. परंतु या कंपनीमध्ये आता मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Amazon Layoffs : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून अमेझॉन (Amazon) कंपनीला ओळखले जाते. परंतु या कंपनीमध्ये आता मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमेझॉन आपल्या कंपनीतील १८,००० हुन अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती ॲमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अँडी जॅसी (Amazon CEO Andy Jassy) यांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे यावेळची टाळेबंदी Amazon Layoffs च्या आधीच्या नियोजनापेक्षा मोठी असू शकते. तंत्रज्ञान क्षेत्रातील चालू असणाऱ्या मंदीचा फटका हा अमेझॉन कंपनीला देखील बसला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेझॉन कंपनीने आपल्या कंपनीतील १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता अमेझॉनने १८ हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. हि अमेझॉनमधील सर्वात मोठी नोकरी कपात असल्याचं देखील बोललं जात आहे. सध्याच्या काळात अमेझॉनची वाढ हि झपाट्याने कमी झाली आहे. अश्या सर्व परिस्थितीत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून कंपनी आपला खर्च कमी करत आहे.

कोविड १९ च्या काळात अमेझॉनने मोठ्या संख्येने लोकांची भरती करुन त्यांना कामावर ठेवले होते. परंतू, कंपनीला आता आपला हाच निर्णय जड जात आहे. त्यामुळेच अमेझॉन कंपनी कर्मचारी कमी करण्याचा मोठा निर्णय घेणार आहे. १८ हजार कर्मचार्‍यांची कपातीचा अर्थ असा आहे की कंपनी ७० टक्के नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत आहे. अमेझॉनने ही नोकरकपात केली तर कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी कॉस्ट कटिंग असेल.

२०२२ या सालापासून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहेत. आता अमेझॉनने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय हा घेतला आहे. त्याआधी मायक्रोसॉफ्ट (Microsoft), त्यापाठोपाठ ट्विटर (Twitter) आणि फेसबुकची (Facebook) मालकी असलेली मेटा (Meta) या सर्व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

हे ही वाचा:

पक्ष बळकटीसाठी उद्धव ठाकरे स्वतः राहणार नाशिकमध्ये उपस्थित, जानेवारीअखेरीस होणार जाहीर सभा

Mhada नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात, स्वतःच्या हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल

Trimbakeshwar Jyotirlinga मंदिर आजपासून ८ दिवस राहणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss