spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बापरे! प्रियकरासाठी भर रस्त्यात दोन मुलींची हाणामारी

कहर म्हणजे भांडणं सोडवण्यासाठी मध्ये पडणाऱ्या लोकांचे ही यांनी काही एक ऐकले नाही.

हल्द्वानी : अनेकदा आपण भर रस्त्यात मारामारी होताना चे व्हिडिओ पाहतो. असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी फार वेळ लागत नाही. डिलिव्हरी बॉय ला मारहाण, रस्त्यात ट्रॅफिक हवलदाराला शिवीगाळ व वादाचे व्हिडिओ आजकाल सरास पहायला मिळतात. पण नुकताच एक मारामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. चक्क या मुलींनी प्रियकरासाठी रस्त्यावर एकमेकींना मारहाण केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहींनी हा व्हिडिओ पाहून त्या मुलींवर कडक शब्दात टीका ही केली आहे.

मुलींच्या मारामारीचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ हल्द्वानी येथील हिरानगर पोलीस योग पार्क इथला आहे. जिथे मुलींच्या दोन गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. या मुली इतक्यावरच थांबल्या नाहीत तर रस्त्यात भांडत असताना एकमेकींना शिवीगाळ ही केली. महत्वाचे म्हणजे मारामारी मध्ये या दोघीच सामील नव्हत्या तर आणखीन पाच सहा मुलींचा ही यात सहभाग होता. या व्हायरल व्हिडिओ मध्ये या मुली एकमेकांचे केस ओढत दांड्याने एकमेकांना मारताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यानी संताप व्यक्त केला आहे. कहर म्हणजे भांडणं सोडवण्यासाठी मध्ये पडणाऱ्या लोकांचे ही यांनी काही एक ऐकले नाही. दोघी मुली स्वतःचा ग्रूप एकत्र आणून मारामारी करत आहेत.

हेही वाचा :

नरेश म्हस्के यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती

 

शेवटी पोलिस आल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. पोलिसांनी मध्यस्ती करत दोघींची भांडत सोडवली. व्हायरल झालेला मुळ व्हिडिओ askbhupi या ट्विटर अकाऊंट वरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती व्हिडिओ शेअर करत दिली आहे.

 

Latest Posts

Don't Miss