spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दबंग स्टाईलमध्ये २ कांगारूंची हाणामारी ! व्हिडिओ होतोय तुफान वायरल

आपण अनेकदा रस्त्यावर, बाजारात, घरात बऱ्याच ठिकाणी लोकांची भांडणं (Fight) बघतो. कधी कधी तर लोकं अक्षरशः लाथा बुक्क्यांनी मारामारी करतात. आपल्या भारतीय लोकांना सुद्धा लोकांच्या भांडणात भलताच रस असतो. रस्त्यावर कुणी मारामारी करताना दिसलं की आपण कितीही घाईत असू, आपण वेळ काढून ती मारामारी पाहायला थांबतेच .

आपण अनेकदा रस्त्यावर, बाजारात, घरात बऱ्याच ठिकाणी लोकांची भांडणं (Fight) बघतो. कधी कधी तर लोकं अक्षरशः लाथा बुक्क्यांनी मारामारी करतात. आपल्या भारतीय लोकांना सुद्धा लोकांच्या भांडणात भलताच रस असतो. रस्त्यावर कुणी मारामारी करताना दिसलं की आपण कितीही घाईत असू, आपण वेळ काढून ती मारामारी पाहायला थांबतेच . भांडण ही आपली आवडती गोष्ट आहे. असाच एक भांडणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. पण या व्हिडिओमध्ये माणसं एकमेकांशी न भांडता चक्क २ कांगारू हे भांडत आहेत.

 तुम्हाला जर भांडण बघायला आवडत असेल तर तुम्हाला हा विडिओ नक्कीच आवडेल. कारण हा व्हिडीओ कांगारूंचा (Kangaroo Video) आहे. 2 कांगारू हे जबर हाणामारी करताना व्हिडिओ मध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे हे दोन कांगारू मारामारी करत असताना बाकीचे कांगारू हे भांडण मजा घेऊन बघतायत. जसा माणूस माणसांची भांडणं पाहतो अगदी तसंच आहे. आपण पाहिलं असेलच की ज्या पद्धतीने दोन व्यक्ती भांडत असतात आणि बाकीचे लोकं त्यांच्या भांडणातून सुटका करून घेण्याऐवजी त्यांची भांडणं पाहत राहतात, तसाच काहीसा प्रकार या व्हीडीओ मध्ये पाहायला मिळत आहे.

कांगारूंचा हा फाइट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान शेअर होत आहे. हे कांगारूंची आधी हातांनी लढाई सुरू करतात. मग मध्येच एखादी लाथ मारतात. “उडून बुक्की” असं कधी काय ऐकलंय का? हे दोघेही तसंच करतायत, एकमेकांना उडून बुक्की मारतायत. बराच वेळ ते एकमेकांशी भांडतायत, पण माघार घेण्याचे नाव घेत नाहीत. आता त्यांची लढाई कुठे संपली असेल ते त्यांचं त्यांनाच माहित. पण ही लढाई हुबेहूब माणसांसारखी होती आणि त्यात मजाही होती. अवघ्या ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ८ लाखपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

कांगारूला शाकाहारी आणि शांत प्राणी मानलं जातं. पण हा व्हिडीओ पाहून या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. अक्षरशः लाथा, बुक्क्यांनी मारामारी करणारे हे कांगारू बघू,”अरे बापरे” म्हणावं की “शो क्यूट” असा प्रश्न पडतो.

हे ही वाचा:

नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मंदिर आता २२ तास खुले राहणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss