spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Watch Video, चक्क लग्नात नवऱ्यामुलीने दिरासोबत धरला ठेका

लग्न म्हटलं कि वरात आलीच आणि वरातीतला बेफान डान्स हा येतोच. लग्नात बरीच मंडळी सगळं काही विसरून बेभान होऊन नाचत असतात. कित्येकदा हा नाच प्रेक्षणीय देखील असतो. आई-वडील,आजी-आजोबा,काका-काकू या नात्यांमधली खूलून येणारी मजा हि लग्नात दिसून येते. लग्नात नातेवाईक, सर्व मित्रमंडळींची बेभान होऊन आनंद लुटतात . तसेच प्रत्येक लग्नात (Wedding) नाच-गाणे हे खूप जास्त महत्वाचे असते. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आणि त्या व्हिडिओ मध्ये चक्क नवऱ्यामुलीने तिच्या दिरासोबत नाचताना ठेका धरला आहे.

असं म्हणतात लग्नात नवरा – नवरीला नाचवलल्याशिवाय लग्नाला रंग चढत नाही. इथे तर चक्क नवरी दिरासोबत नाचतेय असा व्हिडिओ झालाय इंस्टाग्रामवर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आपल्या दिरासोबत मनसोक्त नाचत आहे. दोघेही सगळाविसरुंन नाचण्यात मग्न आहेत. सगळी मंडळी त्यांच्याकडे बघतच बसली. आणि महत्वाचा म्हणजे बिचारा नवरा सुद्धा दोघांना प्रेक्षक होऊन बघत बसला .

असे म्हटले जाते की, सर्व नात्यांमध्ये दीर आणि वहिनीचे नाते सर्वात खास असते. लग्नात ह्या दोघांची जोडी नेहमी पहिल्या नंबरात असते. या व्हिडिओमध्ये भावजय आणि दीराचं नातं स्पष्ट होतंय. दोघांची निखळ मैत्री सोबत तितकाच आदर नाचतानाही दोघांनी ठेवल्याचे या व्हिडिओमधून दिसले आहे. नाती जपावी तर अशी.

कपल ऑफिशियल पेज नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याला ३७०० हून जास्त लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट केली वह्हा भाबी वर देवर कि जोडी खूब जमी एकाने लिहिला की, ‘वाह काय डान्स आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘डान्स परफॉर्मन्स पाहून मागे असलेले लोकही आश्चर्यचकित झाले.’ ‘हा व्हिडीओ खूप छान होता. अश्या बऱ्याच छान प्रतिक्रिया ह्या डान्सर जोडीला आल्या .

हे ही वाचा:

Sania Mirza एनडीएच्या फ्लाइंग विंगमध्ये सानिया मिर्झाची निवड, देशातील पहिली मुस्लिम तरुणी फायटर पायलट बनणार

Maharashtra Assembly Winter Session 2022 ‘कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय’, मविआ आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss