समोसा, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये? हे नाश्त्याचे बिल होतेय सोशल मीडियावर व्हायरल

फराह खानच्या ट्विटर बायोनुसार ती एक पत्रकार आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,'दो समोसा, एक चाय और एक पानी की बोतल की कीमत मुंबई एयरपोर्ट पर ४९० रुपये है!! काफी अच्छे दिन आ गए हैं।'

समोसा, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये? हे नाश्त्याचे बिल होतेय सोशल मीडियावर व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक ट्विट खूप व्हायरल होत आहे. हे ट्विट दुसरे तिसरे काहीही नसून मुंबई एअरपोर्टवरून खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांचे बिल आहे. फराह खान या ट्विटर यूजरने तिने बिल ट्विटरवर शेअर केले आहे. तिने मुंबई विमानतळावर एक चहा, दोन समोसे आणि पाण्याची बाटली विकत घेतली होती. फक्त इतक्याशा खाद्यपदार्थांच्या खरेदीचे बिल ४९० रुपये झाले आहे. त्यामुळे हे ट्विट व्हायरल होताच आता विमानतळावर खाद्यपदार्थ इतके महाग का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फराह खानच्या ट्विटर बायोनुसार ती एक पत्रकार आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,’दो समोसा, एक चाय और एक पानी की बोतल की कीमत मुंबई एयरपोर्ट पर ४९० रुपये है!! काफी अच्छे दिन आ गए हैं।’ (‘मुंबई विमानतळावर दोन समोसे, एक चहा आणि पाण्याच्या बाटलीची किंमत ४९० रुपये आहे! खूप चांगले दिवस आले आहेत.) तसेच हे ट्विट व्हायरल होताच या ट्विटवर यूजर्स विविध कमेंट करत आहेत.

फराह खानने शेअर केलेल्या बिलानुसार तिने मुंबई विमानतळावर एक आल्याचा चहा, दोन समोसे आणि पाण्याची बाटली (आवा वॉटर) खरेदी केली. चहाची किंमत १६० रुपये होती. दोन समोस्यांची किंमत २६० रुपये आणि पाण्याच्या बाटलीची किंमत ७० रुपये होती. अशा प्रकारे फराहचे बिल ४९० रुपये झाले.

एका वापरकर्त्याने सांगितले की किंमती जास्त का आहेत

फराहचे हे ट्विट पाहताच व्हायरल झाले आहे. ट्विटर यूजर्सच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एका वापरकर्त्याने विमानतळाच्या किंमती जास्त का आहेत हे सांगणारी एक बातमी शेअर केली आहे. युजरने लिहिले, ‘हा तुमच्यासाठी बातमीचा अहवाल आहे, तो वाचा आणि समजून घ्या की विमानतळावर उत्पादनांच्या किमती बाहेरच्या तुलनेत जास्त का आहेत. तसेच, मोदी सरकार आणि यूपीए सरकार या दोन्ही काळात किंमतीतील हा फरक सारखाच होता. पत्रकारांच्या नावावर त्यांचा अजेंडा चालवणारे लोक म्हणजे शरमेची बाब आहेत.

ट्विटर यूजरने शेअर केलेला फोटो एंटरटेनमेंट टाइम्सचा आहे. या अहवालात, कॅफे दिल्ली हाइट्सचे मालक विक्रांत बत्रा म्हणाले, “विमानतळाच्या आउटलेटवर आमच्या उत्पादनांच्या किमती इतर ठिकाणच्या आउटलेटपेक्षा १५-१८ टक्क्यांनी जास्त आहेत. विमानतळाच्या आउटलेटसाठी आम्हाला खूप जास्त भाडे द्यावे लागते. तिथे रेस्टॉरंट चालवणे खूप अवघड आहे. आम्हाला काही विशिष्ट पात्रता असलेले कर्मचारी नियुक्त करावे लागतील (सुरक्षेच्या कारणास्तव). त्यांचा पगार इतर कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त आहे. तसेच स्टोरेज आणि इन्व्हेंटरी वाहतूक खर्च जास्त आहे. कारण इन्व्हेंटरी अनेक सुरक्षा तपासणीतून जाते.

हे ही वाचा:

Tunisha Sharma Suicide Case पोलिसांनी केली तुनिषाच्या कुटुंबियांची गुप्त ठिकाणी चौकशी केली, हे सत्य आले समोर

BrahMos Missile ची IAF ने केली यशस्वी चाचणी घेतली, जाणून घ्या शत्रूला हादरवणाऱ्या ‘या’ क्षेपणास्त्राची खासियत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version