5 टक्के जीएसटी वाढीमुळे ‘अमुल’ ची उत्पादने महागली

जीएसटीमध्ये वाढ झाल्यामुळे मुळचे दही, दुध, ताक महागले

जीएसटीमध्ये वाढ झाल्यामुळे मुळचे दही, दुध, ताक महागले

मुंबई : जीएसटी परिषदेने पाकीटबंद पदार्थांवर पाच टक्के जीएसटी वाढवल्यामुळे आजपासून (19 जुलै) अमूलने आपल्या दही, लस्सी, ताक आणि फ्लेवर मिल्कच्या दरात काहीशी वाढ केलेली दिसून येते. या सर्व उत्पादनांसह लोकांच्या पसंतीस पडणारे अमुलचे दूधही आता महागणार असल्याचे समोर येत आहे. जरी १८ एप्रिलपासून या सर्व पदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला होता तरी सध्या या उत्पादनांच्या किंमतीत वाढ झालेली दिसून येते.
अमूल कंपनीने मुंबईतील आपल्या २०० ग्रॅमच्या दह्याच्या कपाची किंमत २१ रुपये तर ४०० ग्राम या दह्याच्या कपाची किंमत ४२ रुपये केली आहे. ४०० ग्राम दह्याच्या पाकिटाची किंमत आता ३० रुपयांवरून ३२ रुपये करण्यात आली आहे. तसेच दह्याच्या एक किलोच्या पाकिटाच्या किंमतीत आता चार रुपयांनी वाढ झाली आहे म्हणजेच जे पाकीट ६५ रुपयांना मिळत होते त्याची किंमत आता ६९ रुपये झाली आहे.
मुंबईत ५०० मिली अमूल ताकाची किंमत १५ ऐवजी १६ रुपयांत मिळणार आहे. तर अमूल लस्सी देखील आता १ रुपयाने महागली आहे. अमूल कंपनी लहान पाकिटांवर वाढलेल्या दराचा खर्च उचलणार असून जीएसटी वाढल्यामुळे मोठ्या पाकिटांचे दर वाढवणे गरजेचे आहे, असे अमूलचे मॅनेजिंग डायरेक्टर आरएस सोढी यांनी सांगितले.
Exit mobile version