5G in India : आजपासून इंटरनेट सुस्साट… जाणून घ्या संपूर्ण माहिती

आजपासून संपूर्ण देशात 5G इंटरनेट सेवा (5G Internet Service) सुरु होत आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022) 5जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात येईल.

आजपासून संपूर्ण देशात 5G इंटरनेट सेवा (5G Internet Service) सुरु होत आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress – IMC 2022) 5जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात येईल. यामुळे आता भारतातही इंटरनेट सुस्साट होणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन आयडिया (Vodafone-idea) या कंपन्या स्पर्धेत आहेत.

5G इंटरनेट सेवा म्हणजे Fifth Generation अर्थात पाचवी पिढी असा आहे. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशनची पाचवी पिढी म्हणून ओळखली जाते. 5G नेटवर्क 2G , 3G , 4G नेटवर्कपेक्षा अधिक वेगवान असेल. 5G नेटवर्क 4G पेक्षा कमीतकमी 10 पटीने वेगानं इंटरनेट स्पीड देईल.

तुम्हाला 5G इंटरनेट सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 5G मोबाईल असणं गरजेचं आहे. 4G स्मार्टफोनमध्ये 5G सेवा चालवता येईल, असं म्हटलं जात होतं. मात्र 5G सेवा फक्त 5G स्मार्टफोनमध्येच चालेल आणि यासाठी तुम्हाला नवीन 5G स्मार्टफोन घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, 2G फोनमध्ये 4G सिम इन्स्टॉल करता येते, पण त्यावर फक्त 2G सेवा उपलब्ध असते. तसेच जर तुम्ही 2G किंवा 3G फोनमध्ये Jio सिम कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला तर ते चालत नाही. याचं कारण म्हणजे Airtel, Vodafone Idea सिमकार्डमध्ये 4G सोबत 2G आणि 3G सेवा आहे. तर Jio कडे फक्त 4G नेटवर्क उपलब्ध आहे. त्यामुळे जिओ सिम कार्ड 2G किंवा 3G फोनमध्ये सपोर्ट करत नाही. त्यामुळे तुम्हाला 4G स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क वापरता येणार नाही, 4G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फक्त 4G नेटवर्क स्पीड मिळेल. त्यामुळे 5G इंटरनेटसाठी 5G स्मार्ट फोन आवश्यक आहे.

5G इंटरनेटमुळे तुम्हाला अवघ्या काही सेकंदांमध्ये चित्रपट डाउनलोड करता येतील. टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पीडबाबत चाचण्या केल्या आहेत. ज्यामध्ये 5G चा स्पीडचा चांगला अनुभव आला आहे. एअरटेलने (Airtel) 5Gच्या चाचणीमध्ये 3000 एमबीपीएस पर्यंतचा वेग मिळवला होता. तर व्हीआयने (Vodafone-idea) 3.7 Gbps पर्यंत स्पीड गाठला होता. तर, जिओला 5G नेटवर्कच्या टेस्टमध्ये 1000 एमबीपीएस पर्यंतचा स्पीड मिळाला आहे.

सध्या बाजारात 2G ते 4G पर्यंत सिम कार्ड उपलब्ध आहे. काही कंपन्यांच्या मते, 4G सिम कार्डमधेच 5G इंटरनेट सेवा वापरता येईल. तुम्ही तुमचं 4G सिम कार्ड 5G मध्ये अपग्रेड करु शकता. यामुळे 4G वरून 5G सेवा अपग्रेड केल्यानंतर सिम कार्ड ग्राहकांना बदलावं लागणार नाही. ग्राहकांना त्यांच्या टेलिकॉम ऑपरेटरना कळवून त्यांचं 4G कनेक्शन थेट 5G मध्ये रूपांतरित करता येईल.

हे ही वाचा:

National Film Awards 2022 : ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा अखेर पार पडला; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…

मोदींचा व्हिडिओ होतोय तुफान वायरल ! रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधानांनी थांबवला ताफा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version