5G Internet : देशात 5G इंटरनेट सेवेचा झाला शुभारंभ

आजपासून देशात 5G इंटरनेट सेवेचा (5G Internet Service) शुभारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022) 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

आजपासून देशात 5G इंटरनेट सेवेचा (5G Internet Service) शुभारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress – IMC 2022) 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 5G इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे.

भारतामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) यासारख्या टेलिकॉम कंपन्यांनी याआधी दिवाळीमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला भारतामधील प्रमुख १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे. आता कोणती टेलिकॉम कंपनी कोणत्या दरात 5G इंटरनेट सेवा देते हे पाहावं लागणार आहे.

सुरुवातीला देशातील १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या १३ शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येईल. भारतात आजपासून 5G इंटरनेट सेवा सुरु होणार असून मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.

5G नेटवर्कचा भारताला खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यका. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर 5G नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

पुढे 5G साठी आम्ही पुढाकार घेण्यास तयार आहोत. 5G कनेक्टिव्हिटी हे तंत्रज्ञानाच्या पुढील पिढीपेक्षा बरंच काही आहे, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितलं. तसेच आज महत्त्वाचा दिवस आहे. एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे. ही सुरुवात स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात होत आहे. यामुळं लोकांसाठी अनेक नवीन संधी खुल्या होतील, असं भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक-अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितलं.`

सध्या भारत जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारत आता अमेरिका (America), चीन (China), जपान (Japan) आणि जर्मनी (Germany) या देशांनंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. विशेष म्हणजे या आधी पाचव्या क्रमांकावर ब्रिटन होता. पुढच्या काही वर्षांमध्ये या क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठी 5G इंटरनेट सेवेचा मोठा फायदा होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

हे ही वाचा:

National Film Awards 2022 : ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा अखेर पार पडला; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…

68th National Film Awards 2022 : ‘हा ‘ सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version