spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारीला भव्य सोहळा, बिग बी ते अंबानीसह ७ हजार जणांना आमंत्रण

अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारीला रामल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे.

अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारीला रामल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. यावेळी अयोध्येतील नव्या भव्य दिव्य राम मंदिरा रामलल्लांच्या अभिषेक प्रसंगी सोहळ्याला देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तीना निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी ७ हजार जणांना आमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 22 जानेवारीला अयोध्येतील नव्या राम मंदिराचे उद्घाटन (Ayodhya Ram Lalla New Grand Teample) करणार आहेत. त्यांच्या हस्ते रामलालाचा अभिषेकही केला जाणार आहे.

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, फिल्म स्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह जवळपास ७ हजार पेक्षा जास्त जणांना राम मंदिरात राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’ मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही बोलवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी १९९२ मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योग गुरु राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपति गौतम अदाणी यांचा समावेश आहे.

या सोहळ्यासाठी साहित्य, कला, क्रीडा, क्षेत्रातील दिग्गज तसेच राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे बडे नेतेही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात बोलवण्यात येणार आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. शिवाय धर्मगुरूंनाही बोलावण्यात येणार आहे. केवळ हिंदूच नव्हे तर जैन धर्मातील महागुरूंचाही समावेश करण्यात आला आहे. जैन धर्मगुरू आचार्य लोकेश मुनी यांनाही मंदिर ट्रस्टने कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

हे ही वाचा:

Maharashtra Assembly Winter Session 2023, पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद तापला

नवाब मलिक कोणत्या गटासोबत? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची पंचाईत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss