Yemen च्या राजधानीमध्ये पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, ७९ नागरिकांचा मृत्यू

रमजान (Ramadan 2023) उत्साहावर विरजण घालणारी बातमी यमनमधून समोर येत आहे. यमनची (Yemen) राजधानी साना येथे जकात वाटण्याच्या कार्यक्रमा चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली आहे.

Yemen च्या राजधानीमध्ये पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, ७९ नागरिकांचा मृत्यू

रमजान (Ramadan 2023) उत्साहावर विरजण घालणारी बातमी यमनमधून समोर येत आहे. यमनची (Yemen) राजधानी साना येथे जकात वाटण्याच्या कार्यक्रमा चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत किमान तब्बल ७८ लोक मरण पावले आहेत. तर ३२२ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सानामध्ये नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापाऱ्यांकडून नागरिकांना पैशांचं वाटप केलं जात होतं. मात्र, यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात ७८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

हे ही वाचा : 

मुंबई मेट्रो प्राधिकरणाला सुप्रीम कोर्टाने झापले, १० लाखांचा दंड

Eid-ul-Fitr 2023, भारतात ईद-उल-फित्र कधी साजरी होईल, ईदची नेमकी तारीख आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version