गुजरात मध्ये कच्छ किनारपट्टी भागातून ८0 किलोचे ड्रग्स जप्त

गुजरात भागात अंमली पदार्थ सापडण्याच्या घटना काही वेळा समोर आल्या आहेत.

गुजरात मध्ये कच्छ किनारपट्टी भागातून ८0 किलोचे ड्रग्स जप्त

गुजरात भागात अंमली पदार्थ सापडण्याच्या घटना काही वेळा समोर आल्या आहेत. गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबत माहिती दिली आहे. “गांधीधाम पोलिसांनी ८० किलो कोकेन जप्त केलं आहे , ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे८०० कोटी रुपये इतकी आहे गुजरात पोलिसांना अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे. गुजरातमध्ये पोलिसांनी८० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. याची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत ८०० कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी शोध सुरु केला. पोलिसांना समुद्रात अंमली पदार्थांची पाकीटे सापडली आहेत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गुजरात पोलिसांनी किनार्‍यावरून ८० किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ८०० कोटी रुपये इतकी आहे .

पोलिसांना ड्रग्जच्या डिलिव्हरीबाबत माहिती मिळाली होती. असं पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितलं होत यानंतर पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम चालू केली. यावेळी पोलीस समुद्र किनाऱ्यावरून कोकेनची ८० पाकिटे जप्त केली आहेत. या ड्रग्सची किंमत ८०० कोटी रुपये आहे.प्रत्येकी १ किलोची ८० पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पॅकेटचे वजन हे एक किलोग्रॅम असंआहे. कच्छ-पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितलं की, कदाचित पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांनी येथे ड्रग्ज टाकून पळ काढला असावा, कारण पोलीस या ठिकाणी लक्ष ठेवून होते अशी माहिती पोलिसानं मार्फत मिळाली आहे .

हे ही वाचा: 

२० तासांच्या मिरवणुकीनंतर Lalbaugcha Raja गिरगाव चौपाटीवर दाखल, विसर्जनासाठी भाविकांचा जनसागर लोटला

शेतकरी सेनेच्या शेतकरी संवाद यात्रेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शुभारंभ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version