भारत सरकारचा मोठा निर्णय, चिनवरून येणाऱ्या सर्व प्रवाशांची होणार कोरोना चाचणी

भारत सरकारचा मोठा निर्णय, चिनवरून येणाऱ्या सर्व प्रवाशांची होणार कोरोना चाचणी

चीनमधील (China) कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे भारतासह जगभरात चिंतेचे वातावरण आहे. चीनमध्ये, हे ओमिक्रॉनचे (Omicron) सब-व्हेरियंट BF7 खूप वेगाने पसरत आहे, यामुळे येत्या काही दिवसांत १.५ दशलक्षाहून अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. याचाच आता भारतातही परिणाम दिसू लागला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर बैठक घेतली. या बैठकीनंतर आरोग्य मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. आता चीनमधून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विमानतळावर तपासणी केली जाईल.

चीनमधून (China) येणाऱ्या लोकांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. सरकार पूर्णपणे सतर्क असून आजपासून म्हणजेच बुधवारपासूनच विमानतळावर (Airport) तपास सुरू करण्यात आला आहे. आजपासून देशातील विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे नमुने घेण्यासही सुरुवात झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

गुजरातमध्ये दोन आणि ओडिशातील एक प्रकरण समोर आले आहे. यामुळेच भारत सरकार कोरोनाबाबत पूर्णपणे सतर्क झाले आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनीही बुधवारी सांगितले की, कोरोना अद्याप संपलेला नाही. यातच केंद्रीय मंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल (Dr. VK Paul) यांनी लोकांना मास्क (Mask) घालण्याचे आवाहन केले. भारतातील पात्र लोकसंख्येपैकी केवळ २७-२८ टक्के लोकांनी कोविड-१९ साठी प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे हे लक्षात घेऊन, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी गर्दीच्या ठिकाणी लसीकरण करून मास्क वापरण्याचा सल्ला दिला. पॉल म्हणाले, “लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे. ज्यांना आधीच आजार आहे किंवा वृद्ध आहेत त्यांनी विशेषतः त्याचे पालन करावे.”

हे ही वाचा:

CAT 2022 परीक्षेचा निकाल झाला जाहीर, अशा पद्धतीने निकाल घ्या जाणून

छगन भुजबळांची पुन्हा भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरु करण्याची केली मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version