Vadapav : खाद्द्य प्रेमींना मोठा धक्का वडापाव महागणार, कारण आलंय समोर

Vadapav : खाद्द्य प्रेमींना मोठा धक्का वडापाव महागणार, कारण आलंय समोर

साधारणतः १० रुपयांपासून विकल्या जाणाऱ्या आणि भुकेला साथ देणाऱ्या वडापाव मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनलाय. भुकेच्या वेळी पोटाला आधार देणारा मुंबईकरांचा आवडता वडापाव लवकरच महागण्याची चिन्हे दिसत आहे. पावाच्या दरात वाढ झाल्याने वडापावसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पावासाठीचा कच्चा माल महागल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे पाव उत्पादकांकडून सांगण्यात आले. सा सध्या हाच वडापाव एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलाय, ते कारण म्हणजे वडापाव महागणार. वडापाव महागण्यामागे एक मोठं कारण समोर आलंय.

हेही वाचा : 

कोणाचीही वैयक्तिक जाहिरात नाही, ही जाहिरात सरकारची आहे; अनिल परब

पाव उत्पादक संघटनेशी संलग्नित असलेले पाव पुरवठादार निलेश मोरे यांनी सांगितले की, ‘मागील वर्षीपर्यंत पावासाठीच्या मैद्याचे ५० किलोचे पोते १२०० ते १४०० रुपये होते. त्याचा दर आता १६०० रुपयांच्या घरात गेला आहे. पावाच्या भट्टीसाठी लागणारे अन्य सामानदेखील महागले आहे. डिझेल दरवाढीमुळे वाहतूक महागली आहे. यामुळे पाव उत्पादन ते विक्री, या खर्चात जवळपास निम्म्याने वाढ झाली आहे.’

T20 WC 2022 : भारत आणि पाकिस्तान दोघेही उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात का?

मुंबईत माहिम, वांद्रे, लोअर परळ, विलेपार्ले, अंधेरी या भागात पावांचे उत्पादन होत असते आतापर्यंत पावाचा दर साधारणत: २ रुपये प्रति पाव असा होता. यात उत्पादन खर्च दीड रुपया होता. मात्र आता उत्पादन खर्चच प्रति पाव २ रुपये झाला त्यामुळे पावाची किंमत वाढली. आता ३ रुपयांपर्यंत पावाची किंमत वाढविण्यात आली आहे. सहा पावांची लादी आता १२ ऐवजी १६ रुपयां मिळणार असून विक्रेते आता ही लादी २२ ते २४ रुपयांना विकू शकतात. जर असे झाले तर वडापावचे भाव सुद्धा वाढणार.

अक्षय कुमारचे मराठी चित्रपटात पदार्पण, चित्रपटात साकारणार ‘ही’ महत्वाची भूमिका

Exit mobile version