Whatsapp युजर्ससाठी मोठी उपडेट, असं वापरता येणार नवीन अपडेट

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँप (WhatsApp) प्रत्येकवेळी काही ना काही नवीन फिचर अपडेट करत असते. याद्वारे वापरकर्त्यांना अधिक चांगला आणि सुरक्षित चॅटींग अनुभवता येईल यासाठी हा प्लँटफॉर्म अनेक नवीन अपडेट करत असते.

Whatsapp युजर्ससाठी मोठी उपडेट, असं वापरता येणार नवीन अपडेट

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँप (WhatsApp) प्रत्येकवेळी काही ना काही नवीन फिचर अपडेट करत असते. याद्वारे वापरकर्त्यांना अधिक चांगला आणि सुरक्षित चॅटींग अनुभवता येईल यासाठी हा प्लँटफॉर्म अनेक नवीन अपडेट करत असते. आता आणखी एक नवे अपडेट झाले आहे. याद्वारे फेसबुक आणि व्हाट्सअँप हे दोन्ही अँप एकमेकांशी जोडले आहेत. व्हाट्सऍप व्यतिरिक्त मेटाच्या मालकीच्या अँपमध्ये फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामचाही (Instagram) समावेश आहे. आता वापरकर्ते त्यांचे व्हाट्सअँप स्टेटस फेसबुकवर फक्त एका बटनावर शेयर करू शकणार आहेत.

इंस्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांची २४ तासांची स्टोरी त्यांच्या फेसबुकवर शेयर करण्याचा सोपा पर्याय दिला आहे. आता अशीच संधी व्हाट्सअँप स्टेटसवरही उपलब्ध होणार आहे. व्हाट्सअँप स्टेटस प्रमाणे फेसबुक आणि इंस्टग्राम स्टोरी देखील २४ तासांसाठी शेयर केली जाऊ शकते. व्हाट्सअँपने एका नवीन घोषणेमध्ये म्हंटले आहे की, आता फेसबुक स्टोरीजमध्ये व्हाट्सअँप स्टेट्स आपोआप शेयर केले जाईल आणि फेसबुकवर सेटिंग सक्षम केल्यांनतर असा पर्याय उपलब्ध होईल. व्हाट्सअँपने स्टेटसमध्ये एक नवीन बटण दिले आहे. जे सध्या माय स्टेटससह दिसत असलेल्या शेयर आयकॉन म्हणून दिसणार आहे. या बटणावर टॅप केल्यानंतर व्हाट्सअँप स्टेट्स फेसबुकवरही शेयर करता येणार आहे. एवढेच नाही तर युजर्सला हवे असल्यास फेसबुक स्टोरीमध्ये व्हाट्सअँप स्टेटस आपोआप शेयर करण्याचा पर्याय निवडता येणार आहे.

नवीन अपडेट मिळाल्यांनतर सर्व वापरकर्त्यांना अगोदर व्हाट्सअँप वर कोणतेही स्टेटस ठेवावे लागतील आणि नंतर खाली दिलेल्या नोटिफिकेशनवर क्लिक करा. व्हाट्सअँप स्टेटस शेयर केल्यांनतर फेसबुक स्टोरी सेक्शनमध्ये शेयर करण्याचा सोपा पर्याय निवडता येतो. सेट अप पर्यायावर टॅप केल्यानंतर ऑन स्क्रीन सूचनांचे अनुकरण करायचे आहे. ऑप्शन सेट केल्यानंतर, पुढच्या वेळी तुम्ही व्हाट्सअँपवर जे स्टेट्स शेयर कराल ते फेसबुक स्टोरीमध्येही दाखवले जाणार आहेत. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे फिचर ठेवू शकता.

हे ही वाचा : 

मुंबई महानगरपालिकेचा निर्णय इतर मनपांना लागू होणार आहे का?

RRvsLSG, राजस्थान रॉयल्सचा विजयरथ लखनौ सुपर जायंट्स रोखणार का?

पुन्हा पडद्यावर दिसणार इरफान खान, इरफानचा नवीन लवकर होणार प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version