spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bomb Cyclone अमेरिकेत भर ख्रिसमसमध्ये ‘बॉम्ब चक्रीवादळा’चा कहर, ४८ डिग्री तापमानात अठरा जणांचा मृत्यू

अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बर्फाचं वादळ (America) पहायला मिळातंय. या ‘बॉम्ब चक्रीवादळ’मुळं आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झालाय. तर, संपूर्ण यूएसमध्ये बर्फाळ वारं वाहताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेत ५२०० उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

हेही वाचा : 

कॉमेडी चित्रपटांचे शॉकिंग आहेत?, तर एकही पैसा खर्च न करता ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर हा मजेदार चित्रपट विनामूल्य पहा

अमेरिकामधील सध्याचं तापमान – ४८ डिग्रीपर्यंत घसरलं आहे. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिमवादळामुळे येथील जनजिवन विस्कळीत झालं आहे. गाड्यांचे अपघात, झाडे कोसळणे, यासह परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. अमेरिकेत आलेलं हिमवादळ हे बम चक्रीवादळ आहे. या चक्रीवदळामुळे आतापर्यंत १८ जणांना आपला जीव गमावावा लागलाय. तर १८ लाखांपेक्षा जास्त लोक घरात अडकले आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमानसेवा खंडीत झाली आहे. त्यामुळे विमानतळावरच हजारो नागरिक अडकले आहेत.

बॉम्ब चक्रीवादळामुळे अमेरिका व कॅनडातील नागरिकांच्या ख्रिसमसच्या आनंदावर विरजन पडले. नेशव्हीलध्ये विमानतळावर अडकलेल्या एका प्रवाशाने अल जजीराला सांगितले की, मी मिशिगनमध्ये आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी जात होतो. पण आता मी येथे अडकलो आहे. माझे कुटुंब सातत्याने मला फोन करत आहे. मी आहे तिथेच सुरक्षित रहावे असे त्यांना वाटते.

Main Atal Hoon या चित्रपटातील अटलजींच्या भूमिकेतील पंकज त्रिपाठीचा फर्स्ट लूक आला समोर

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळांवरील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी ८ वाजता वॉशिंग्टनमधील एकूण ४४९ विमाणे रद्द केली गेली. यात शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व फ्लाईट बंद करण्यात आल्या आहेत. कॅलिफोर्नियामध्ये देखील ५१ उड्डाणे रद्द करण्यात आलीत.

Latest Posts

Don't Miss