spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लखनौ येथील हॉटेलमध्ये अग्नितांडव

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याने खळबळ माजली आहे. हजरतगंज येथील हॉटेल ‘लेवाना’मध्ये सकाळच्या सुमारास आग लागली.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याने खळबळ माजली आहे. हजरतगंज येथील हॉटेल ‘लेवाना’मध्ये सकाळच्या सुमारास आग लागली. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये अनेक लोक उपस्थित होते. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने, खिडकीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढलं जात आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 लेवाना असं आग लागलेल्या हॉटेलचं नाव असून अनेक जण हॉटेलातील रुममध्ये अडकले आहेत. परंतु आतापर्यंत १३ लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. लेवाना हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. हॉटेलच्या खोल्यांमध्ये अनेक लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर आगीमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचे देखील कळत आहे. अद्याप जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने अग्निशमन दलाच्या बचावकार्यात अडथळा येत आहे. यामुळेच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी खिडक्या फोडत आहेत. काही लोक जखमी झाल्याची माहितीही मिळत आहे. मात्र अद्याप त्याला दुजोरा देण्यात आलेला नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या डझनहून अधिक गाड्या उपस्थित आहेत.

 लेवाना हॉटेल लखनऊमधील सर्वात उच्चभ्रू भागात असलेल्या हजरतगंजमध्ये आहे. लखनौ रेल्वे स्टेशनपासून ते फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. याच हॉटेलजवळ हजरतगंज मेट्रो स्टेशन देखील आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार हॉटेलला लागलेली आग खूप गंभीर आहे. हॉटेलमध्ये बरेच लोक आहेत. आपत्कालीन एक्झिट तोडून लोकांना बाहेर काढले जात आहे. सकाळी ६ वाजता ही आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केलं. धूर झाल्याने हॉटेलमधील अनेकांचा जीव गुदरमत होता. आतमध्ये अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करण्याचं मोठं आव्हान अग्निशन दलासमोर होतं.

सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त हाती आलेलं नाही. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या काहीजणांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

किंग कोहलीचे अर्धशतक पूर्ण, टीम भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने

सूर्यग्रहणाच्या काळात ‘ही’ कामे चुकूनही करू नका

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss