Wednesday, July 3, 2024

Latest Posts

स्वातंत्र्यलढ्यातील एक बुलंद आवाज हरपला ..

स्त्रीया या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात म्हणून त्यांनी काही महिलांना बरोबर घेऊन १९७५ साली ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’ ची स्थापना केली व भाजीपोळीचे डबे पुरवायला सुरुवात केली. १९८२ साली गिरणी कामगारांच्या अभूतपूर्व संपानंतर मुंबईतील गिरण्या बंद पडल्या.

प्रेमाताई पुरव (Prematai Purav) यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे  त्यांच्या तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. ९०-९५ वर्षांचं आयुष्य अत्यंत सार्थकी लावणारं जीवन जगून गेल्या. हसतमुख चेहरा, अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व आणि त्या सगळ्यामागे एक जबाबदारी घेणारं, कणखर व्यक्तिमत्वं म्हणजे प्रेमाताई पुरव. स्त्रीला अन्नपूर्णा मानणं, गृहलक्ष्मी मानणं हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. घरोघरी काबाडकष्ट करून, स्वत:ला झिजवून इतरांच्या भुकेची काळजी करणारी अन्नपूर्णाच ती. पण प्रेमाताईंनी या अन्नपूर्णेतून नावापुरती नाही तर खरोखरीची गृहलक्ष्मी घडवली. तिच्या अंगभूत आणि परंपरागत कौशल्यातून आपल्या पायांवर उभं राहण्यासाठीच्या स्त्रियांच्या प्रक्रियेला त्यांचा कणखर हात लागला.
अशा स्त्रीला अन्नपूर्णा मानणाऱ्या अश्या प्रेमाताई पुरव यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३५ रोजी गोव्यात झाला. त्या अगदी लहानपणापासूनच निडर, कार्यतत्पर होत्या. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. त्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनातदेखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्यावर त्यांनी आपले सर्व आयुष्य महिलांना उद्योजिका बनवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याच्या कार्यात झोकून दिले. प्रेमाताई म्हणजे सामाजिक कार्य, महिलांचे शिक्षण आणि पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. प्रेमा पुरव यांनी महिलांसाठी दादर येथे ६० वर्षापूर्वी ‘अन्नपूर्णा’ नावाचा स्तुत्य उपक्रम सुरू केला. साधारण १९८० च्या सुमारास प्रेमा यांनी नवी मुंबई येथे सिडकोकडून या संस्थेसाठी एक प्लॉट मिळवला. या ठिकाणी एक स्वयंपाकघर तयार करून अनेक महिलांना त्यांनी उद्योग उपलब्ध करून दिला.
स्त्रीया या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात म्हणून त्यांनी काही महिलांना बरोबर घेऊन १९७५ साली ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’ ची स्थापना केली व भाजीपोळीचे डबे पुरवायला सुरुवात केली. १९८२ साली गिरणी कामगारांच्या अभूतपूर्व संपानंतर मुंबईतील गिरण्या बंद पडल्या. कामगार कायदे बदलल्यावर गिरणी व्यवसायातून स्त्रिया बाहेर फेकल्या गेल्या होत्या तेव्हा त्यांनी कामगारांच्या घरातील स्त्रियांना खाणावळ चालवण्याचे धडे दिले, म्हणजे १९५०-५५ सालची ही गोष्ट आहे. या गिरणी कामगार स्त्रियांनी आपापल्या पातळीवर घरगुती खानावळी सुरू केल्या. अशा सगळ्या स्त्रियांना एकत्र करून प्रेमाताईंनी अन्नपूर्णी महिला सहकारी सोसायटी लिमिटेड ही संस्था सुरू केली.
मुंबईसारख्या शहरात घरातून निघून रोज दोन-तीन तास प्रवास करून कार्यालयामध्ये पोहोचणाऱ्या नोकरदार माणसाला ताजं, सकस, गरम जेवण कामाच्या ठिकाणी हवंच होतं. असं जेवण घरगुती पातळीवर बनवणाऱ्या स्त्रियांना काम हवं होतं. ही साखळी जुळली आणि एक मोठा व्यवसाय उभा राहिला. कौशल्य आणि गरज यांचा ताळमेल घालणारा. दोन्ही बाजूच्या गरजा पूर्ण करणार हे कर्तव्य मानून मोठ्या मानाने ही नवी इमारत त्यांनी उभी केली. हे समाज कार्य उभाराहील, त्याच्यामागे होतं प्रेमाताई पुरव यांचं मजबूत संघटनकौशल्य आणि साध्यासुध्या स्त्रियांसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा.
गेली दोन दशके प्रेमाताईंच्या ज्येष्ठ कन्या डॉ. मेधा सामंत-पुरव या ‘अन्नपूर्णा परिवारा’तील सहा सहयोगी संस्थांची धुरा सांभाळत आहेत. अश्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने अखेरचा श्वास घेतला.
प्रेमाताई पूरव यांना प्राप्त झालेले पुरस्कार :
  • प्रेमाताईंच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने २००२ साली त्यांना ‘पद्मश्री’ सन्मान देऊन गौरवले आहे.
  • ‘अखिल भारतीय महिला शिक्षण निधी संस्थे’ने २००२ साली ‘स्त्री रत्न’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

Latest Posts

Don't Miss