प्रियकराने मरण पावलेल्या प्रेयसीशी केले लग्न; पुन्हा विवाह न करण्याचे घेतले वचन

प्रियकराने मरण पावलेल्या प्रेयसीशी केले लग्न; पुन्हा विवाह न करण्याचे घेतले वचन

प्रेमाला कोणतीही सीमा नसते हे आपल्याला माहिती आहे. तसेच ‘खरे प्रेम कधीच मरत नाही’ हे प्रचलित वाक्य आपण सर्वांनी ऐकले आहे. तसेच प्रेमासाठी काही लोक सर्व मर्यादा ओलांडतात असे आपण बऱ्याच सिनेमांमध्ये पहिले असेलच. पण अशीच घटना एका व्हिडिओमार्फत सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. यात एक तरुण मृत प्रियसीशी लग्न करताना दिसतो आहे. ही व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे यात हा तरुण मृत मैत्रिणीशी विधीरित्या लग्न करत कायमस्वरूपी अविवाहित राहण्याचे वचन घेताना दिसत आहे .

मिळालेल्या माहिती नुसार व्हिडिओमधील मुलाचे नाव बिटुपन तामुली असे आहे आणि मृत मुलीचे नाव प्रार्थना बोरा असे आहे. हे दोघे बऱ्याच दिवसातून प्रेमात आहेत. त्यात प्रार्थना गेल्या काही दिवसांपासून भरपूर आजारी आहे. तिच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते पण तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बातमीमुळे प्रियकर बिटुपन हादरला आणि तिच्या घरी गेला व्हिडिओमध्ये प्रार्थनाची आई मुलीच्या मृतदेहावर रडताना दिसली. मुलगी आणि मुलगा अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि जेव्हा शोकांतिका घडली तेव्हा त्यांचे लग्न होणार होते. प्रियकर बिटुपन हा प्रियेसीचा मृतदेह पाहून हतबल झाला आणि रडायला लागला आणि तिची वधू बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या मृतदेहाशी लग्न केले.त्यावेळेस त्याने लग्नादरम्यान प्रियसी प्रार्थनाच्या गळ्यात हार देखील घातला.आणि परंपरेनुसार मुलीशी लग्न केले आहे .कायम स्वरूपी अविवाहित राहणार असे वाचनही दिले.

मृत व्यक्तीशी लग्न करणे आपल्यापैकी बहुतेकांसाठी असामान्य असले तरी, ‘प्रेथा कल्याणम’ किंवा ‘मृतांचे लग्न’ नावाची एक अत्यंत-असामान्य परंपरा अजूनही कर्नाटक तसेच केरळच्या काही भागांमध्ये काही समुदायांनी जिवंत ठेवली आहे. हे बहुतांश लोकांना या पाराम्पारे विषयि जास्त माहित नाही.या व्हायरल व्हिडिओला मोठ्याप्रमाणात व्युव्हर्स मिळाले असून नेटकरी भरपूर भावुक होत आहेत.

भावना गवळींचा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत व आमदार नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

Exit mobile version