दिल्ली विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली

दिल्ली विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली

दिल्ली विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे. आज दिल्ली विमानतळावर एक कार शेड इंडिगो विमानाच्या चाका जवळ येऊन थांबली सुदैवाने विमानाचे चाक आणि गाडीची धडक झाली नाही. या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकला असता परंतु विमान चालकाच्या प्रसंगावधानाने हा मोठा प्रसंग टाळला आहे. दिल्ली विमानतळावरील गाडी हि गो फस्ट एअरलाइनची होती. ही घटना विमानतळाच्या टर्मिनल T2 च्या स्टॅण्ड क्रमांक 201 वर झाली. या ठिकाणी Go First एअरलाइन्सची गाडी इंडिगोच्या A320neo या फ्लाइटच्या चाकाजवळ आली. या घटनेमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या धक्का दायक प्रकार नंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेत नेमकी कोणाची चुकी आहे? याचा तपास केला जात आहे.

हेही वाचा : 

आमिर खान: ‘कॉफी विथ करण 7’मध्ये करिनाने केली आमिरची खिल्ली, अभिनेता म्हणाला- शोमध्ये अपमान आहे

Exit mobile version