अनंतनागमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनंतनागमध्ये सध्या भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) चकमक सुरु आहे.

अनंतनागमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनंतनागमध्ये सध्या भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) चकमक सुरु आहे. दहशतवादा विरुद्ध भारतीय लष्कराकडून ही कारवाई केली जात आहे. येथे कोकरनागमध्ये आज शनिवारी (१६ सप्टेंबर) सलग चौथ्या दिवशीही दहशतवाद्यांशी चकमक सुरु आहेत. कोकरनागमध्ये २ ते ३ दहशतवादी लपून बसले आहेत. ज्यांना भारतीय लष्कराने घेरले आहे. सुरु असलेले ऑपरेशन लवकर संपवण्यासाठी त्यांच्यावर रॉकेट लाँचर आणि इतर जड शस्त्रांनी हल्ला केला जात आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कर डोंगरावर ड्रोनने बॉम्बफेक करत आहे. रॉकेट लाँचरमधून बॉम्बफेकीचा व्हिडीओही समोर आला आहे.

१३ सप्टेंबर पासून अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे एकूण तीन अधिकारी शहीद झाले आहेत. १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धनोक आणि डीएसपी हुमायून मुजम्मिल भट्ट हे अधिकारी शहीद झाले आहेत. तर या कारवाईमध्ये एक जवान देखील शहीद झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दशतवाद्याकडील दारुगोळा संपल्यामुळे आता ते डोंगर भागात लपून बसले आहेत. जर त्यांना सुरक्षा दलांपासून पळून जाण्यात यश आले तर ही कारवाई लवकर संपवली जाईल. चकमक परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला असून त्या दिशेने सर्वसामान्यांच्या हालचालींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. चकमकीदरम्यान लोकांनी स्फोटांचे आवाज ऐकले आहेत.काश्मीरच्या एडीजीपींनी माहिती दिली आहे. तेव्हा X वर लिहिले, ऑपरेशन विशिष्ट इनपुटच्या आधारे केले जात आहे.२-३ दहशतवादी घेरले आहेत, त्यांना लवकरच पकडले जाईल.

काश्मीर मधल्या या दहशतवादी घटनेमागील पाकिस्तानचे कारस्थान उघड झाले आहे. क्रॉस बॉर्डर कॉल इंटरसेप्शन हे उघड झाले की घुसखोरी आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्याची सीमेपलीकडून योजना आखली जात होती. भारतात झालेल्या G 20 परिषदेमधील यशस्वी संघटनेने पाक लष्कराला अस्वस्थ केले आहे. अनंतनागमध्ये मंगळवारी आणि बुधवारी रात्री दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने ही शोध मोहीम सुरू केली आहे. अनंतनागमध्ये मंगळवारी आणि बुधवारी रात्री दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने ही शोध मोहीम सुरू केली आहे.

Exit mobile version