spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Instagram Reels बनवणाऱ्यांसाठी आलं खास फीचर…

Instagram Reels बनवणाऱ्यांसाठी आलं खास फीचर...

आजकाल इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) ची क्रेझ सगळ्यांमधेच आहे.इंस्टाग्राम (Instagram) वर रील्स बनवणारे लोकं रातोरात स्टार झालेत आणि प्रसिद्धीच्या झोतात आलेत,रील्स वर लोकं मिलिअन्स मध्ये लाईक्स आणि कमेंट्स (Likes and Comments) करतात. आजकल रील्स बघणं हा बऱ्याच लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला आहे, मोकळ्या वेळेत रील्स बघणं हे सगळ्यांनाच आवडतं, केवळ तरुणाई मध्येच नव्हे तर लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच इंस्टाग्रामवर रील्स बनवतात आणि पाहतात. या इंस्टाग्रामवर रील्स बनवणाऱ्या क्रिएटर्ससाठी एक खुशखबर आहे. लवकरच इन्स्टा यूजर्सना आता आपल्या रील्समध्ये गाण्यांचे लिरिक्स (Lyrics) देखील अ‍ॅड करू शकणार आहेत.हा पर्याय आत्तापर्यन्त फक्त इंस्टाग्राम स्टोरीस (Instagram Stories) साठी होता. मात्र, आता इंस्टाग्राम रील्समध्ये देखील यूजर्सना एखाद्या गाण्याचे बोल अ‍ॅड करायचे असतील तर ते करू शकतील. यामुळे काही अवघड गाण्यांचे शब्द इतर यूजर्सना स्क्रीनवरच दिसू शकणार आहेत. इंस्टाग्राम रील्स एडिट करताना क्रिएटर्स हे लिरिक्स अ‍ॅड करू शकणार आहेत.

इन्स्टाग्रामचे असणारे सीईओ अ‍ॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी याबाबत माहिती दिली आहे. अ‍ॅडम मोसेरी म्हणाले की लवकरच हे फीचर अँड्रॉईड(Android) आणि आयओएस (IOS) या दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध होणार असून येत्या काळात कंपनी रील्ससाठी आणखी काही खास फीचर्स लाँच करणार आहे, असंही अ‍ॅडम मोसेरी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

इंस्टाग्रामवर देखील एआय फ्रेंड (AI Friend) मिळणार

स्नॅपचॅट(Snapchat) अ‍ॅपवर ज्याप्रमाणे यूजर्सना एआय फ्रेंड (AI Friend) उपलब्ध आहे हा एआय फ्रेंड अगदी ऑनलाईन मित्रासारखा आहे; एआय फ्रेंड (AI Friend) आपल्याशी संवाद देखील साधू शकतो आणि विचारलेले प्रश्न देखील सोडवण्यास मदत करतो, त्याचप्रमाणे आता इन्स्टाग्राम या ऍपवर देखील एक एआय चॅटबॉट (AI Chatbot) उपलब्ध होऊ शकतो. याबाबत एका टिपस्टरने माहिती दिली आहे. पण इंस्टाग्राम कंपनीकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा : 

लातूरमधील धक्कादायक घटना उघडकीस, मागणी मान्य होईपर्यंत तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय

नागराज मंजुळेचा बहुप्रतिक्षित ‘नाळ २’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss