spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्घाटनादरम्यान काँगोमध्ये कोसळणाऱ्या पुलाचा व्हिडीओ होतोय चांगलंच व्हायरल

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे, ज्यात लोक बांधकामाच्या दर्जाची खिल्ली उडवत आहेत.

अधिकारी उद्घाटन करण्यासाठी जमले असताना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो (डीआरसी) मधील एक पूल कोसळला आहे, स्थानिक खामा प्रेस वृत्तसंस्थेनुसार. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे, ज्यात लोक बांधकामाच्या दर्जाची खिल्ली उडवत आहेत. पावसाळ्यात स्थानिकांना नदी ओलांडता यावी यासाठी हा छोटा पूल बांधण्यात आला होता. पुलाच्या आधी तेथे असलेली तात्पुरती रचना वारंवार तुटत असे, वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

एका व्हिडिओमध्ये अधिकृत कार्यक्रमादरम्यान पुलाचे औपचारिक उद्घाटन करण्यासाठी अधिकारी उभे असल्याचे दाखवले आहे.व्हिडीओत एका पुलावर काही लोक उभे आहेत एक नेता पुलाचं उद्घाटन करत आहे. फित कापताच पूल तुटतो आणि पुलावरील नेत्यांसह सर्वच्या सर्व लोक पुलावरून धाडकन कोसळतात.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की महिला अधिकारी मदत मागत आहे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला पडत्या पुलावरून ओढत नेले आहे. या व्हिडिओत अधिकृत शिष्टमंडळातील बाकीचे सदस्य लटकले दिसतात पण सुदैवाने सुरक्षा अधिकारी मदतीला धावून गेल्यामुळे ते जमिनीवर पडण्यापासून वाचले आहेत.iHarare नुसार ही घटना गेल्या आठवड्यात घडली असून पूलाचे कोसळून दोन तुकडे झाले आहेत

“तरुण हा खंड हा सोडून जात आहेत, हे यातून दिसून येतं. अयशस्वी नेतृत्वानंतर या दुर्घटनेनं आपलं जगात हसू केलं आहे”, असं या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे..

हे ही वाचा:

सरकार आणि एलआयसी मिळून विकणार आयडीबीआय बँकेतील ६०% हिस्सा?

बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी नखावरील धूळही उडणार नाही, आव्हाड यांचा बावनकुळे यांना जोरदार टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss