मालकासह डिलिव्हरी करण्यासाठी फिरणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

'खरी मैत्री अशी दिसते. काहीही असो, हा कुत्रा त्याच्या सुरक्षेसाठी नेहमी त्याच्यासोबत असेल.'

मालकासह डिलिव्हरी करण्यासाठी फिरणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

मालकासह डिलिव्हरी करण्यासाठी फिरणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

प्राणी हे जरी मुके प्राणी आले तरी त्यांच्या कृतीतून आणि विविध हालचालींमधून ते सतत आपल्या मालकाप्रती वाटणारं प्रेम व्यक्त करत असतात. प्राण्यांचे विविध प्रकारचे व्हिडिओ हे इंटरनेटवर व्हायरल होत असतात आणि लोकांनाही ते फार आवडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यात एक कुत्रा आपल्या मालकासोबत फूड डिलिव्हरी करतांना दिसतोय.

शिवांग नावाच्या युजरने 31 जुलै रोजी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता, जो इंस्टाग्राम आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पोस्ट शेअर करताना यूजरने लिहिले की, ‘खरी मैत्री अशी दिसते. काहीही असो, हा कुत्रा त्याच्या सुरक्षेसाठी नेहमी त्याच्यासोबत असेल.’

तो पुढे म्हणाला, ‘या सुंदर डिलिव्हरी बॉयचे नाव जॅक आहे. तो नेहमी फूड डिलीव्हरीसाठी जातो आणि त्याच्याबरोबर हा कुत्राही जातो.’ व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला स्कूटीवर पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीसोबत कुत्राही असल्याचे दिसते आहे.

इंस्टग्रामवर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला आतापर्यंत 1.3 मिलियनपेक्षा जास्त व्युज मिळाले आहेत. यासह, व्हिडिओला 1.64 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा

शिंदेंची फटकेबाजी आणि फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक!

जाणून घ्या ‘मद्रास’च्या जन्मामागाची इतिहास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version