वाराणसीतील भुताचा व्हिडिओ होतोय व्हायरल, पांढऱ्या आकृतीमुळे भीतीचं वातावरण

या व्हिडीओची पोलिसांनी गांभीर्याने नोंद घेतली असून या प्रकरणी कायदेशीर तक्रार देखील नोंदवली आहे.

वाराणसीतील भुताचा व्हिडिओ होतोय व्हायरल, पांढऱ्या आकृतीमुळे भीतीचं वातावरण

खरंच भूतं असतात का? हा प्रश्न गेली अनेक दशकं सातत्यानं विचारला जात आहे. काही जणांच्या मते भूतं असतात. त्यांनी भूतांचा अनुभव घेतलेला आहे. तर काहींच्या मते भूतं किंवा अतृप्त आत्मे ही केवळ एक कल्पना आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ देवांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसी इथला आहे. या ठिकाणी चक्क भूतं फिरत असल्याचा दावा केला जात आहे. ही भूतं रात्रीच्या अंधारात लोकांना पछाडत आहेत. अर्थात पोलीस या प्रकरणी चौकशी करत असून या भूतांमागे कोणाचा हात आहे? हे लवकरच समोर येईल असं आश्वासन देत आहेत. मात्र तो पर्यंत हा घोस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ @banarasians या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. घरांच्या छतांवर भूतं फिरत असल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक पांढरा कपडा हवेत उडत आहे. या कपड्यानं माणसासारखा आकार धारण केलाय. त्यामुळे ते भूतच असल्याचा दावा केला अनेकांकडून जातोय.

या व्हिडीओनं सोशल मीडियावर एकच खळबळ उडवली आहे. या व्हिडीओची पोलिसांनी गांभीर्याने नोंद घेतली असून या प्रकरणी कायदेशीर तक्रार देखील नोंदवली आहे. पोलीस या भूतांचा शोध घेत आहेत. लवकरच या भूतांमागची माणसं पकडली जातील असं आश्वासन त्यांनी लोकांना दिलं आहे. पण या व्हिडीओमुळे मात्र वाराणसीत एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

हे ही वाचा:

‘मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, सोनिया गांधींची माफी मागितली’, दीड तासाच्या बैठकीनंतर गेहलोत स्पष्टीकरण

आता आपले सण उत्सव हे बंधन घालूनच साजरे करावे लागणार – सुप्रिया सुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version