ओडिशातील सिमलीपाल नॅशनल पार्कमधील दुर्मिळ काळ्या वाघाचा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल…

सिमलीपालमध्ये स्यूडोमेलेनिस्टिक वाघ आढळतात

ओडिशातील सिमलीपाल नॅशनल पार्कमधील दुर्मिळ काळ्या वाघाचा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल…

निसर्गात घडणार प्रत्येक बदल,त्यात आढळणार प्रत्येक जीव हा वेगळा आहे. कारण या ग्रहावर अस्तित्वात असलेला प्रत्येक प्राणी हा अद्वितीय आहे. अशाच एका अद्वितीय प्राण्याचा म्हणजेच ओडिशातील एका राष्ट्रीय उद्यानात दिसलेल्या एका भव्य काळ्या वाघाचा व्हिडिओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी सोशल मीडियावर शेयर केला.

ही क्लिप मूळतः IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी शेयर केली होती. ओडिशाच्या सिमलीपाल नॅशनल पार्कमध्ये चित्रित केलेला हा व्हिडिओ असून, व्हिडिओमध्ये एका सुंदर काळ्या रंगाच्या आणि अंगावर केशरी पट्टे असलेल्या वाघाची झलक आपल्याला पाहता येते. ह्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये कासवान लिहितात, “भारताचे काळे वाघ. तुम्हाला माहीत आहे का? सिमलीपालमध्ये स्यूडोमेलेनिस्टिक वाघ आढळतात. जे त्यांच्यातील जेनेटिक म्युटेशनमुळे इतर वाघांपेक्षा वेगाने दिसतात आणि फार दुर्मिळदेखील आहेत.”

कासवान या सुंदर प्रजातींबद्दल आणखी माहिती देत म्हणतात. “या दुर्मिळ वाघांचा प्रथम अधिकृतपणे STR मध्ये २००७ मध्ये शोध लागला. कालांतराने, आणखीही दस्तऐवजीकरण करण्यात आले.हे वाघ त्यांच्यातील जेनेटिक म्युटेशनमुळे फार दुर्मिळ आहेत आणि ते फार कमी संख्येत आढळतात,” तसेच पुढे कासवान यांनी वाघांच्या रंगांमधील फरकाबद्दलच्या माहिती देणाऱ्या एका मनोरंजक लेखाची लिंक देखील शेअर केली आहे.

या व्हिडिओला ८३ हजारांपेक्षा जास्त व्हीव्हस आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. लोक या वाघाच्या सौंदर्यामुळे भारावून गेले आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी आतापर्यंत या काळ्या वाघांबद्दल अनेक लेख आणि कलाकृती शेअर केल्या आहेत.

 

Exit mobile version