spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Aadhaar Free Update Deadline Extend : आधार अपडेटच्या अंतिम तारखेत बदल, वापरकर्त्यांना लाभली शेवटची संधी

Aadhaar Free Update Deadline Extend : ज्या नागरिकांना त्यांचे आधार कार्ड (Aadhaar Card) अपडेट करायचे होते त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मोफत आधार अपडेट (Aadhaar Free Update) करण्याची अंतिम मुदत आता 14 सप्टेंबर ऐवजी 14 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) यांच्याकडून दहा वर्षांपूर्वी बनवलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा चौदा सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले होते. मात्र ही सुविधा आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.

सुरुवातीला आधार अपडेट (Aadhaar Update) ची तारीख 14 मार्च ते 14 जून 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून 14 सप्टेंबर 2024 पर्यंत करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा आधार अपडेट करण्याच्या तारखेत नवीन अपडेट आले आहेत. आता नागरीक 14 डिसेंबरपर्यंत पूर्णपणे मोफत पद्धतीने त्यांचे आधार कार्ड अपडेट ((Aadhaar Card Update) करू शकणार आहेत. मात्र 14 डिसेंबर 2024 नंतर जर कोणी आधार कार्ड अपडेट करणार असेल तर मात्र त्यांच्याकडून शुल्क आकारले जाणार आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त ऑनलाईन (Online) पद्धतीने उपलब्ध आहे. आधार कार्ड मध्ये तुम्हाला कोणताही बदल करायचा असल्यास जसे की, तुमचा फोटो अपडेट (Photo Update) करायचा असेल किंवा तुमच्या पत्त्यामध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन शुल्क भरावे लागणार आहे. हे जे बदल आहेत ते नागरिकांना आधार केंद्रावर जाऊनच करता येणार आहेत.

UIDAI च्या https://uidai.gov.in/ या  अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून होम पेजवर असलेल्या माय आधार (My Aadhaar) या पोर्टलवर जाऊन नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी (OTP) वापरून नागरिकांना लॉग इन करता येणार आहे. यानंतर तुमची माहिती तपासून जर ती माहिती बरोबर असेल तर योग्य बॉक्सवर तुम्हाला खूण करायची आहे. त्यानंतर जर माहिती चुकीची असेल तर ड्रॉप डाऊन या मेनूमधून ओळख कागदपत्रे निवडायचे आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व कागदपत्रे अपलोड करताना जेपीईजी (JPEG), पीएनजी (PNG) आणि पीडीएफ (PDF) स्वरूपात असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

गुलामीच्या खुणा पुसण्याचे काम PM Narendra Modi करत आहेत, Port Blair नामांतरावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

गुलामीच्या खुणा पुसण्याचे काम PM Narendra Modi करत आहेत, Port Blair नामांतरावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss