spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

या अपघातात इतर दोन लोक दगावल्याचे पोलिसांनी सांगितले तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात चारोटी येथे सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान अहमदाबाद- मुंबई रस्त्यावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. या अपघातात इतर दोन लोक दगावल्याचे पोलिसांनी सांगितले तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात मर्सिडीज गाडी डिव्हायडर धडकल्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारमधून प्रवास करत होते.

मिस्त्री हे वयाच्या 43 व्या वर्षी 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते, त्यानंतर 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना माहिती दिली. “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात दोघे जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-६७०५असा आहे. पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे”. दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

वाणिज्य आणि उद्योग जगताचे “मोठे नुकसान” असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिझनेस टायकूनच्या नुकसानीबद्दल शोक व्यक्त करताना देशाचे नेतृत्व केले. “श्री सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. ते भारताच्या आर्थिक पराक्रमावर विश्वास ठेवणारे एक आश्वासक व्यापारी नेते होते. त्यांच्या निधनाने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. शांततेत,” पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.

त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे.

 

हे ही वाचा:

चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकाला कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण

बिग बॉस मराठीचा चौथा सीजन पुन्हा लांबणीवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss