spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Trend नुसार, लग्न सोहळ्यतील कपड्यामधील Verity 

गुढीपाड्व्ह्याच्या शुभमुहूर्तावर पैठणीचे ड्रेस , पलाझो सेट, पैठणीचे अनारकली आणि त्यामधेय सुद्धा वेगळेपण म्हणजे २पीस सेट तयार केलेले आणि ट्रेंड नुसार परिधान केलेले बघायला मिळाले.तर या नव्या वर्षाच्या नवा सिझनमध्ये लग्नसराई जोरात सुरू होणार असून त्यामध्ये हळदी , मेहेंदी, bride to b,रिसेप्शन साठी काय घालायचं हा मोठा प्रश्न उभा असतो. तसेच कोणती फॅशन करायची असा प्रश्न तूम्हालाही पडला असेलच ना. तर आज मी तूमच्यासोबत काही भन्नाट स्टाईल्स share करणार आहे.

सध्या सर्वत्र नव्या वर्षाच उत्सव सुरुवात आपण केली.आणि त्यावेळेस आपण बघतो ट्रेंड नुसार युथ वर्गाच्या डिमांड सुद्धा वाढत आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सांगता ही नवीन आलेल्या कपड्यांच्या ट्रेंडनुसार बदलताना दिसत आहे. तर मराठी नवीन वर्षाची सुरुवात पण गुढीपाडवा पासून करत असतो. या वर्षी गुढीपाड्व्ह्याच्या शुभमुहूर्तावर पैठणीचे ड्रेस , पलाझो सेट, पैठणीचे अनारकली आणि त्यामधेय सुद्धा वेगळेपण म्हणजे २पीस सेट तयार केलेले आणि ट्रेंड नुसार परिधान केलेले बघायला मिळाले.तर या नव्या वर्षाच्या नवा सिझनमध्ये लग्नसराई जोरात सुरू होणार असून त्यामध्ये हळदी , मेहेंदी, bride to b,रिसेप्शन साठी काय घालायचं हा मोठा प्रश्न उभा असतो. तसेच कोणती फॅशन करायची असा प्रश्न तूम्हालाही पडला असेलच ना. तर आज मी तूमच्यासोबत काही भन्नाट स्टाईल्स share करणार आहे. सर्वांनी तूमच्याकडे पहावे, तुमचं कौतूक करावं, तूमची ड्रेस सुंदर, स्टायलिश आणि कम्फर्टेबल असावा, असे प्रत्येकीलाच वाटते.सगळ्यांचं attraction आपल्या कडेच खेचला जावा असं प्रत्येकीलाच वाटत असता आणि म्हणूनच प्रत्येक तरूणी वर्ग सोशल मिडीयावर नव नवी स्टाईल, ड्रेस शोधत असते.
भारतातील एका शाही घराण्यातील राजकन्येनेकडूनच आपण काही तूम्ही टीप्स घेणार आहोत. तिच्या स्टायलिंग (styling) विषयी आणि तिच्या ग्लॅमरस लुक विषय आपल्यालाच चांगलीच माहिती आहे. ती जेव्हा (ramp wolk) ला उतरते तेव्हा तिच्या अदाकारीनेच आणि तिच्या लुक वर सगळे फिदा होतात. भारतातील एका शाही घराण्यातील राजकन्या असलेली आदिती राव ह्याद्री () ज्यामूळे तुम्ही घरात ठेवलेल्या एका छोट्या पार्टीसाठी ट्रेडिशनल, कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूक कॅरी करू शकाल. या राजकन्येचे नाव अदिती राव हैदरी असे आहे. ती बॉलिवूडमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री देखील आहे.अदितीही हैद्राबाद येथील राजघराण्यातील असल्याची माहिती खूप कमी लोकांना आहे. अदितीच्या वडिलांचं नाव एहसान हैदरी आणि आईचे नाव विद्या राव आहे. ती मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. त्यामूळे लग्नात मिरवताना करता येईल असा शाही लुक तूम्ही तिच्याकडून शिकू शकता.अदितीने काही फोटोज सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. ती नेहमीच सोशल मिडियावर पोस्ट करत असते. आताही तिने शेअर केलेले फोटोज चर्चेत आले आहेत. अदितीकडे एक स्टाईल आयकॉन म्हणून पाहिले असता लक्षात येईल की ती नेहमीच वेगळं काहीतरी करत असते. आताही तिने इंडो-वेस्टर्न लुक ट्राय केलाय. आणि त्यामुळेच तिचा हा ट्रेंड तरुणींच्या पसंतीस उतरत आहे.

 

इंडो वेस्टर्न जंपसूट
जर तुम्हाला साडी किंवा ट्रॅडीशनल अटायर घालून bored झाला असाल तर तुम्ही घरच्या घरी होणाऱ्या समारंभात या प्रकारच्या इंडो-वेस्टर्न जंपसूटची निवड करू शकता. आपण ब्रोकेड किंवा सिल्क फॅब्रिक पॅटर्नवर टेलरसह जंपसूट वापरू शकता. यावर तुम्ही फंकी ज्वेलरी घालू शकता. किंवा Oxcide ज्वेलरी सहा रित्या घालू शकत. हे एकदम स्टायलिश आणि सुंदर आणि कमीत कमी दिसेल.

हळदी समारंभ
जर तूम्हाला एखाद्या लग्नात हळदीसाठीचा लुक हवा असेल. तर हळदीच्या कार्यक्रमासाठी बहुतांश जण पिवळ्या रंगाची theme कपडे परिधान करण्याचा trend झाला आहे. या दिवशी तूम्ही साडी सिल्क पॅटर्नमधील साड्या नेसू शकता. कारण या सिल्क साड्यांमध्ये फोटो चांगले येतात. तसंच अशा साड्या वजनानेही अतिशय हलक्या असतात. या साडीवर तूम्ही सिम्पल छोटा गळ्यासोबतच neckless घालू शकता आणि छोटीशी टिकली लावू शकता

प्लाझो सेट
प्लाझो सेट खूप ट्रेंडमध्ये आहेत. पण तुम्ही त्याला थोडा साधा आणि एथनिक लुक देऊ शकता. फ्लेर्ड प्लाझोसोबत शॉर्ट कुर्ती पेअर काऊ शकता .या लुकवर तूम्हाला दुपट्टा घेण्याचीही काही गरज लागत नाही.

मेहंदी कार्यक्रमासाठी स्पेशल
मेहंदी फंक्शनसाठी साधारणतः गडद हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे. कारण हा रंग गडद असल्याने आपले फोटो चांगले येतात. हिरव्या रंगातील लाईट शेडचाही तूम्ही ड्रेपरी करू शखता. तूम्ही मैत्रिणीची, बहिणीची मेहंदीत मिरवू शकता. या ड्रेसवर मेकअप आणि दागिने देखील आकर्षक निवडा.

अनारकली सूट
अनारकली सूट म्हटलं की अनेक कळ्या असलेला लांबच लांब टॉप आठवतो. पण, तसं नाहीय.तूम्हाला अनारकली ड्रेसमध्येही परफेक्ट दिसायचे असेल तर फ्लोरल पॅटर्न आणि विशेषतः लाईट कलर (light color)ची अनारकली कुर्ता खूपच attractive दिसून येतो. आणि त्यावर long earrings घालू शकता.

लग्नासाठी स्पेशल लुक
लग्नाच्या दिवशी ज्वेलरी मेकअप, हील्स इत्यादी गोष्टींची निवड आपल्या वेडिंग लेहंगा किंवा वेडिंग गाउननुसार करावी. शक्यतो वजनदार दागिने परिधान करणं टाळावं. परंतु नाकातील नाथ घातलीत तर तुम्ही अजून खुलून दिसलं. आणि आता नथीमध्ये सुद्धा खूप verity आलेल्या असल्यामुळे तुम्हाला चॉईस करायला खूप ऑप्शन उपलब्ध झाले आहे.

हे ही वाचा : 

इंडियन आयडॉल १३ चा मानकरी ठरला अयोध्येचा ऋषी सिंग

संजय राऊत यांचे नवे ट्विट,PM Narendta Modi यांच्या मुख्य द्वारावर डिग्रीची फ्रेम लटकवा

उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss