अदानी एन्टरप्राइसेसचा ‘एफपीओ’ रद्द, गुंतवणूकदारांना सर्व पैसे परतवणार

अदानी एन्टरप्राइसेसचा ‘एफपीओ’ रद्द, गुंतवणूकदारांना सर्व पैसे परतवणार

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) कडून ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ म्हणजेच की ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे. हा निर्णय अदानी एंटरप्रायझेसने घेतला असून एफपीओ मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूक दारांना पैसे परतवणार असल्याचे अदानी एंटरप्रायझेसकडून सांगण्यात आले आहे.

अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) या कंपनीला मंगळवारी आत्तापर्र्यंतची ‘एफपीओ’च्या माध्यमातून देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी २०,००० कोटी रुपये उभे करणारी ही समभाग विक्री बाजार स्थितीतही मार्गी लावण्यात यश आले होते. पण बुधवारी अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises) संचालक मंडळाने बैठक बोलावी या बैठकीत संचालक मंडळाकडून ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळेस मंडळाकडून सांगण्यात आले की, “सध्याची बाजारातील अस्थिरता आणि अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेता ‘एफपीओ’मधून मिळविलेला निधी परत करून, हा पूर्ण झालेला व्यवहार मागे घेत आहोत. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या गुंतवणूकदार समुदायाच्या हितरक्षणाचे कंपनीचे यामागे उद्दिष्ट आहे,’’ असे अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेस कंपनीने त्यांच्या प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले आहे. या विषयावर अब्जाधीश आणि अदानी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की ‘या विलक्षण परिस्थितीत ‘एफपीओ’च्या प्रक्रियेत पुढे जाणे नैतिकदृष्टय़ा योग्य होणार नाही,” असे संचालक मंडळाला वाटले म्हणून ‘एफपीओ’ रद्द करून गुंतवणूक दारांना सर्व पैसे परतवण्याचा निर्णय घेण्यात आला”. असे कंपनीकडून सांगण्यात आले.

अदानी एंटरप्रायझेसचे संचालक गौतम अदानी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे की, ““गेल्या ४० वर्षांच्या आमच्या प्रवासात मला सर्वच भागधारकांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. विशेषत: गुंतवणूकदारांनी मला पाठिंबा दिलाय. मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे, ते त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच आहे. माझ्या यशासाठी तेच कारणीभूत आहेत.माझ्यासाठी माझ्या गुंतवणूकदारांचं हित हे सर्वात महत्त्वाचं आहे. इतर सर्वकाही दुय्यम आहे. गुंतवणूकदारांना संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी आम्ही एफपीओ मागे घेतला आहे”, असे म्हणत गौतम अदानी यांनी गुंतवणूक दारांच्या हितासाठी निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी नाकारली, पुरातत्व खात्याविरोधात शिवप्रीमींनी दिल्ली हायकोर्टात केली याचिका

राशी भविष्य, २ फेब्रुवारी २०२३, आज तुमच्या जीवनातील मोठ्या निर्णयाचा..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version