spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिंडेनबर्गच्या आरोपांवर अदानीच ४१३ पानाचं उत्तर

अदानी ग्रुपकडून (Adani Group) रविवारी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ग्रुपने हिंडनबर्गच्या (Hindenburg) आरोपांवर ४१३ पानांचे उत्तर दिले आहे. यात अदानी ग्रुपने हिंडनबर्गचे आरोप म्हणजे भारतावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर २४ जानेवारीला ‘मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन’ हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा अहवाल खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्तऐवज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट हेतूने केलेले संयोजन आहे. यात एका विशिष्ट उद्देशाने ग्रुपला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहे, असेही अदानी ग्रुपने म्हटले आहे.

हिंडनबर्गच्या आरोपांवर अदानी ग्रुपने ४१३ पानांचं उत्तर दिलं आहे. हिंडनबर्गचे आरोप म्हणजे भारतावरील हल्ला आहे. बदनाम करण्यासाठी हिंडनबर्गचे आरोप निराधार आहे. मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन’ हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत, हा अहवाल खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्ताऐवज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट केलेले संयोजन आहे. हा आमच्या विरोधात रचलेला एक कट आहे. अहवालात केलेल्या या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यास आम्ही बांधिल नाही. परंतु, हिंडनबर्गने केलेले आरोप खोडून काढण्यासाठी आम्ही या प्रश्नांना उत्तर देत आहोत. अदानींच्या ४१३ पानांच्या रिपोर्ट मधली केवळ ३० पानं आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांशी निगडित आहेत. त्यातही ८८ पैकी ६२ प्रश्नांची उत्तर देण्यात अदानी अपयशी ठरले आहेत. देशाची पद्धतशीर लूट करत स्वतःला भारतीय राष्ट्रध्वजात लपेटून बचाव करू पाहत आहेत, असे हिंडेनबर्गनं अदानी ग्रुपला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे.

हिंडेनबर्ग संशोधन ने आपल्या अहवालात अदानी समूहातील कंपन्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबावाखाली येऊ शकतो, असे या अहवालात म्हटले. त्याशिवाय, अदानी समूहाने शेअर दरात वाढ करण्यासाठी फेरफार आणि इतर प्रकार केले असल्याचा आरोप केला आहे. अदानी समूहाने मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड केल्याचा दावा केला आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर दर अधिक असून मूल्यांकनापेक्षा सुमारे ८५ टक्के अधिक दर आहेत.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांनी दिला आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

Budget 2023, काळानुसार अर्थसंकल्पात झालेला बदल तुम्हाला माहित आहे का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss