spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदित्य’ने काढला सेल्फी

भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान -3 च्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी सॉफ्ट लॅंडींगनंतर लॅंडर आणि रोव्हरची अनेक छायाचित्रे पाठविली आहेत. आता सुर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने पाठविलेल्या आदित्य एल-1 ने देखील कामगिरी सुरु केली आहे.

भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान -3 च्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी सॉफ्ट लॅंडींगनंतर लॅंडर आणि रोव्हरची अनेक छायाचित्रे पाठविली आहेत. आता सुर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने पाठविलेल्या आदित्य एल-1 ने देखील कामगिरी सुरु केली आहे. आदित्यने चांदोबा सोबतचं पृथ्वीचे सुंदर छायाचित्र पाठविले आहे. आदित्य एल-1 ( Aditya L1 ) सुर्याच्या प्रवासाला निघाले असताना आपल्या पृथ्वी आणि चंद्राचा एका फ्रेममध्ये सुंदर फोटो काढला आहे. इस्रोने हा फोटो आपल्या ट्वीटर ( एक्स ) अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ‘आदित्य एल- १’ हा उपग्रह सध्या पृथ्वीच्या कक्षेत आहे. याठिकाणाहून त्याने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो काढले आहेत. सोबतच त्याने सेल्फी देखील क्लिक केला आहे. इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

इस्रोने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये आदित्य उपग्रहाने काढलेला सेल्फी व्हिडिओ आणि पृथ्वी आणि चंद्राचा व्हिडिओ दिसत आहे. आदित्य उपग्रहावरील VELC आणि SUIT हे पेलोड देखील या सेल्फीमध्ये दिसत आहेत. 4 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ टिपण्यात आला होता, असंही यात सांगितलं आहे.

आदित्य एल-१ ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे. २ सप्टेंबर रोजी याचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये आदित्य हा उपग्रह पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-१ या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येईल. सध्या आदित्य उपग्रह हा पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत आहे. १८ सप्टेंबर पर्यंत तो पृथ्वीभोवती फेरी मारेल. यानंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून तो एल- १ पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एल-१ हा अंतराळातील असा पॉइंट आहे, जिथे पृथ्वी किंवा सूर्याचं गुरुत्वाकर्षण जाणवत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेली वस्तू स्थिर राहते. यामुळेच या पॉइंटची निवड करण्यात आली आहे.

हे ही वाचा: 

उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद ; स्मृती इराणी भडकल्या

राज्यभरात दहीहंडी उत्सव जोशात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss