spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आफताबची कोर्टासमोर मोठी कबुली म्हणाला, हत्येनंतर मृतदेहाचे ३५ तुकडे दररोज एक एक करून…

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे. श्रद्धाची हत्या केल्याची कबुली आरोपी आफताबने दिली आहे. श्रद्धा हत्या प्रकरणाची सुनावणी दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये सुरु आहे. कोर्टाने आफताबच्या कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ केली आहे. आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीत, त्यामुळे त्याने पोलिसांसमोर कोणती कबुली दिली नव्हती. परंतु आपण तपासामध्ये सहकार्य करीत असल्याचं आफताबने सांगितलं. रागाच्या भरामध्ये श्रद्धाची हत्या केल्याची कबुली आफताबने दिली आहे. प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा : 

हिवाळयात पपई खाण्याचे आश्चर्यचकित फायदे

दिल्लीतील साकेत कोर्टासमोर कबुली देताना आरोपी आफताब पूनावालानं कोर्टात सांगितलं की, “घटना क्षणार्धातच घडली. तपासात सहकार्य करत असल्याचंही त्यानं कोर्टाला सांगितलं. तसेच पुढे बोलताना मला घडलेली घटना नीट आठवत नसल्याचंही त्यांनं कोर्टाला सांगितलं.

श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताब एखाद्या प्रोफेशनल किलरप्रमाणे पोलिसांची सतत दिशाभूल करत असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. आफताबनं चौकशीदरम्यान सांगितलं की, श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्यानं तीन करवतीच्या ब्लेडचा वापर केला होता. त्यानंतर ते ब्लेड डीएलएफ, गुरुग्राम येथील त्याच्या कार्यालयाजवळ फेकून दिले होते. आफताबनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सलग दोन दिवस ब्लेड्सचा शोध घेतला. पण तिथे काहीच सापडलं नाही. बुधवारी (२३ नोव्हेंबर) पोलीस पुन्हा एकदा शोधमोहीम राबवणार असून यावेळी पोलीस आफताफला सोबत घेऊन जाण्याची शक्यता आहे.

मुलाची हत्या की आत्महत्या?,खुलासा करावा; महाजनांच्या टीकेवर एकनाथ खडसे संतापले

दरम्यान, या प्रकरणामध्ये एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी याचिका दाखल करत दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांचा तपास योग्य रितीने होत नाही. दिल्ली पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, तसंच त्यांच्याकडे तांत्रिक आणि वैज्ञानिक कौशल्याची आणि उपकरणांचीही कमतरता आहे. त्यामुळे ६ महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचे पुरावे आणि साक्षीदार शोधण्यास दिल्ली पोलीस सक्षम नाहीत, असं या याचिकेत म्हटलं आहे.

Gujarat Elections : शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! मतदानासाठी महाराष्ट्रातील गुजरातींना सुट्टी जाहीर

Latest Posts

Don't Miss