भारतात ७० वर्षांनंतर चित्त्याची चाल दिसणार

भारतात ७० वर्षांनंतर चित्त्याची चाल दिसणार

भारतात ७० वर्षांनंतर ‘चित्या ची चाल’ दिसणार आहे. नामिबियामधून आठ चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. नामिबिया येथून विशेष विमानानं आफ्रिकन आठ चित्त्यांचं भारतात आगमन झालं आहे. “नामिबियातील चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये येत आहेत, यापेक्षा मोठी भेट मध्यप्रदेशसाठी नाही. चित्ते नामशेष झाले होते आणि त्यांचा पुन्हा परिचय करून देणे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. या शतकातील ही सर्वात मोठी वन्यजीव घटना आहे. यामुळे मध्य प्रदेशातील पर्यटनाला झपाट्याने चालना मिळेल,” असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

भारताने कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे ७४८ चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी १२ किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येईल. व्हिज्युअलमध्ये दाखवण्यात आलेल्या बोईंग ७४७-४०० विमानातून शुक्रवारी संध्याकाळी नामिबियाची राजधानी विंडहोक येथून त्यांनी उड्डाण केले – सुमारे ११ तासांच्या दीर्घ प्रवासानंतर ग्वाल्हेरमधील भारतीय वायुसेना स्टेशनवर ते उतरले आहेत.

आठ चित्त्यांपैकी पाच २ ते ५ वर्षे वयोगटातील मादी आहेत आणि तीन ४.५ ते ५.५ वर्षे वयोगटातील नर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करार (मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग) अंतर्गत नामिबियामधून चित्ता आणण्यात आले आहेत. “भारतात चित्त्याचा परिचय अंतर्गत प्रोजेक्ट चित्ता केला जात आहे, जो जगातील पहिला आंतरखंडीय मोठा वन्य मांसाहारी ट्रान्सलोकेशन प्रकल्प आहे,” सरकारने अधोरेखित केले आहे. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणं चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येईल.

हे ही वाचा:

मराठवाडा मुक्तिसंग्रामांचा इतिहास शाळेत शिकवा, राज ठाकरेंची मागणी

राशी भविष्य १७ सप्टेंबर २०२२: क्रोध अनावर झालाच तर कदाचित …..

‘आम्ही गुजरात पाकिस्तान नाही…’, वेदांत-फॉक्सकॉन वादावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version