तब्ब्ल दीड वर्षानंतर पाकिस्तानकडून अरनिया सीमेवर गोळीबार

भारत पाकिस्तान (India Pakistan) सीमेवर आज पाकिस्तानकडून आज शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. अरनिया (Arnia) भागामध्ये पाकिस्तान सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे.

तब्ब्ल दीड वर्षानंतर पाकिस्तानकडून अरनिया सीमेवर गोळीबार

भारत पाकिस्तान (India Pakistan) सीमेवर आज पाकिस्तानकडून आज शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. अरनिया (Arnia) भागामध्ये पाकिस्तान सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. तब्ब्ल दीड वर्षानंतर पाकिस्तानकडून या सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. परंतु आज सकाळी पाकिस्तानकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत असून मागच्या काही दिवसांत जम्मूचा काही भाग या हल्ल्यामुळे अशांत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी घालण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे.

आज सकाळी अरनिया सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांवर पाकिस्तानी जवानांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असून हा हल्ला परतवून लावला आहे. त्याबरोबर या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून कुणालाही दुखापत झाली नाही अशी माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा  :

सातारा जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा वाढवणार – शंभूराज देसाई

‘बॉयकॉट बॉलीवूडच्या’ ट्रेंडमध्ये, ४०० कोटींचा ‘ब्रम्हास्त्र’ चे नक्की होणार तरी काय ?

‘… ४५ हून जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष्य ‘, चंद्रशेखर बावनकुळे

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version