spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोरोनानंतर आता Brain-eating amoeba जगभरात केला कहर! दक्षिण कोरियामध्ये ‘ब्रेन-इटिंग अमीबा’शी संबंधित पहिल्या मृत्यूची नोंद

हा एक कोशिकीय अमिबा आहे जो मातीमध्ये राहतो आणि तलाव, नद्या, झरे इत्यादी स्वच्छ उबदार पाण्यात राहतो.

कोरोनाने जगाच्या अनेक भागांत पुन्हा एकदा कहर माजवायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे जग आणखी एका आजारामुळे घाबरले आहे. खरं तर, दक्षिण कोरियामध्ये ब्रेन इटिंग अमिबामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. हा आजार नेग्लेरिया फॉवलेरी (Naegleria fowleri) नावाच्या अमिबामुळे होतो, जो मेंदूला थेट खाऊ लागतो. म्हणूनच त्याला ब्रेन इटर अमिबा (Brain-eating amoeba) म्हणतात. मेंदू खाणाऱ्या या अमिबामुळे दक्षिण कोरियामध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, नेग्लेरिया फॉवलेरी (Naegleria fowleri) हा एक कोशिकीय अमिबा आहे जो मातीमध्ये राहतो आणि तलाव, नद्या, झरे इत्यादी स्वच्छ उबदार पाण्यात राहतो.

नेग्लेरिया फॉवलेरी (Naegleria fowleri) नाकातून मेंदूमध्ये प्रवेश करतो. या आजाराशी संबंधित प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत पण ती फार कमी होती. या अमिबाच्या संसर्गाची पहिली केस १९३७मध्ये अमेरिकेत आली होती. Naegleria fowleri amoeba नाकातून मेंदूपर्यंत पोहोचतो आणि ऊती खाण्यास सुरुवात करतो. त्यामुळे त्याचा संसर्ग जीवघेणा ठरतो. हा अमिबा झपाट्याने त्याचे स्वरूप बदलतो.

हा रोग मानवामध्ये कसा येतो?

मानवाने ज्या ठिकाणी हा अमिबा असतो त्या ठिकाणी आंघोळ केल्यावर नलगेरिया फोव्हलेरी (Naegleria fowleri) अमीबाच्या संपर्कात येतो. हा अमिबा नाकात शिरला तरच अमिबा खाणाऱ्या मेंदूचा (Brain-eating amoeba) संसर्ग होतो.

संसर्गानंतरची लक्षणे

नलगेरिया फावलेरी (Naegleria fowleri)अमिबा मानवी शरीरात प्रवेश करताच त्याची लक्षणे १ ते १२ दिवसांत दिसू लागतात. ही लक्षणे बॅक्टेरियल इन्फेक्शन मेनिंजायटीस सारखीच असतात. सुरुवातीला डोकेदुखी, ताप, मळमळ यासारख्या समस्या उद्भवतात. यानंतर मान ताठ होते आणि रुग्ण पूर्णपणे कोमात जाऊ शकतो.

हा संसर्गजन्य आजार आहे का?

संक्रमित पाणी प्यायल्याने हा आजार होत नाही. CDC नुसार, Naegleria fowleri amoeba अद्याप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाताना दिसलेला नाही. तो संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो की नाही याचा कोणताही पुरावा नाही. पण शास्त्रज्ञ त्याचा धोकाही नाकारत नाहीत. रुग्णाला वाचण्यासाठी डॉक्टर अनेक औषधे एकत्र करून रुग्णाला देतात, परंतु या आजारातून रुग्ण वाचण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणूनच तज्ञ म्हणतात की जिथे हा रोग पसरला आहे तिथे पोहणे टाळा किंवा सार्वजनिक पाण्याचा वापर करू नका.

हे ही वाचा:

Salman Khanच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नजर टाकूया त्याच्या आतापर्यंतच्या टॉप १० चित्रपटांवर

Gandhi Godse Ek Yudh सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट; नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss